T20 महिला वर्ल्ड कप - भारताचं पाकिस्तानसमोर 97 धावांचं आव्हान
By Admin | Updated: March 19, 2016 17:09 IST2016-03-19T17:09:38+5:302016-03-19T17:09:38+5:30
भारताने पहिली बॅटींग करत 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावत 96 धावा केल्या आहेत

T20 महिला वर्ल्ड कप - भारताचं पाकिस्तानसमोर 97 धावांचं आव्हान
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. १९ - भारतीय संघाने पाकिस्तानसमोर 97 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पाकिस्तानने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताने पहिली बॅटींग करत 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावत 96 धावा केल्या आहेत. भारताकडून वेदा कृष्णमुर्तीने सर्वात जास्त 24 धावा केल्या आहेत. दिल्लीतील फिरोजशहा कोटला मैदानात हा सामना सुरु आहे.
पाकिस्तानविरोधात भारताची सुरुवात मात्र अडखळत झाली होती. भारताने सुरुवातीच्या ओव्हरमध्येच झटपट विकेट गमावल्याने धावांचा वेग मंदावला. भारताने पहिल्या मॅचमध्ये बांगलादेशला हरवल्यामुळे भारत आपली विजयी मालिका सुरु ठेवेल अशी आशा आहे. संध्याकाळी धोनी ब्रिगेड नागपुरमध्ये पाकिस्तानशी दोन हात करणार आहे. तर दुसरीकडे महिला क्रिकेट संघदेखील पाकिस्तानला हरवून धोनी ब्रिगेडचा आत्मविश्वास वाढवण्याच्या तयारीने मैदानात उतरली आहे.