स्वित्झर्लंडची होंडुरासवर ३-० ने मात
By Admin | Updated: June 26, 2014 03:59 IST2014-06-26T03:50:25+5:302014-06-26T03:59:36+5:30
फिफा विश्वचषकात होंडुरास विरूध्द स्वित्झर्लंड यांच्यात मध्यरात्री झालेल्या सामन्यात स्वित्झर्लंडने होंडुरास संघाचा ३-० असा दणदणीत पराभव केला.

स्वित्झर्लंडची होंडुरासवर ३-० ने मात
>ऑनलाइन टीम
मनौस, दि. २६- फिफा विश्वचषकात होंडुरास विरूध्द स्वित्झर्लंड यांच्यात मध्यरात्री झालेल्या सामन्यात स्वित्झर्लंडने होंडुरास संघाचा ३-० असा दणदणीत पराभव केला.
स्वित्झर्लंडच्या शाकीरीने ६, ३१ आणि ७१ व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या जोरावर स्वित्झर्लंड संघाने हा सामना जिंकला तर होंडूरास संघाच्या एकाही खेळाडूला गोल करता न आल्याने त्यांना हा पराभव पत्कारावा लागला. स्वित्झर्लंड संघाला या सामन्यात विजय आवश्यक होता. तर होंडूरासचा संघ याआधी झालेल्या दोन्ही सामन्यात पराभूत झाला होता. विजय मस्ट असल्याने स्वित्झर्लंडच्या खेळाडूने प्रारंभीपासूनच आक्रमकपणा अवलंबिला. शाकीरीचा खेळ हा पाहण्याजोगा होता. सामन्याच्या सहाव्याच मिनिटाला त्याने गोल करून आज आपला दिवस असल्याची जाणीव करून दिली होती त्यानंतर त्याने ३१ आणि ७१ व्या मिनिटाला गोल करून संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. दरम्यान, दुस-या अन्य एका सामन्यात इक्वाडो विरूध्द फ्रान्स यांच्यात झालेल्या सामन्यात या दोन्ही संघाना एकही गोल करता न आल्याने हा सामना अनिर्णित राहिला.