स्वीटीचा रशियात ‘गोल्डन पंच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 05:12 IST2018-06-13T05:12:11+5:302018-06-13T05:12:11+5:30

भारतीय बॉक्सर स्वीटी बुरा हिने रशियात आयोजित बॉक्सिंग स्पर्धेत मंगळवारी सुवर्ण जिंकले. स्वीटीने मिडलवेट (७५ किलो) गटाच्या अंतिम सामन्यात अ‍ॅना अनफिनोजिनोवा हिच्यावर विजय मिळविला.

 Switi 'Golden Punch' in Russia | स्वीटीचा रशियात ‘गोल्डन पंच’

स्वीटीचा रशियात ‘गोल्डन पंच’

नवी दिल्ली  - भारतीय बॉक्सर स्वीटी बुरा हिने रशियात आयोजित बॉक्सिंग स्पर्धेत मंगळवारी सुवर्ण जिंकले. स्वीटीने मिडलवेट (७५ किलो) गटाच्या अंतिम सामन्यात अ‍ॅना अनफिनोजिनोवा हिच्यावर विजय मिळविला.
याआधी विश्व युवा चॅम्पियन शशी चोप्रा (५७), पिंकी जांगडा (५१), आणि पवित्रा (६० किलो) यांनी उपांत्य लढती गमविल्याने कांस्यवर समाधान मानावे लागले. विश्व चॅम्पियनशिपचा कांस्य विजेता गौरव विधुडी (५६) यानेही उपांत्य लढत गमविल्याने त्याला कांस्य मिळाले. बृजेश यादव (८१) आणि वीरेंद्र कुमार (९१)हे अंतिम फेरीत दाखल झाले आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title:  Switi 'Golden Punch' in Russia