स्वप्नीलची लक्षवेधी बाजी

By Admin | Updated: June 8, 2015 00:34 IST2015-06-08T00:34:58+5:302015-06-08T00:34:58+5:30

स्वप्नील धोपडे आणि नितीन एस. या दोन्ही भारतीय इंटरनॅशनल मास्टर्स खेळाडूंनी धक्कादायक निकालाची नोंद करताना ८व्या मुंबई महापौर आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेत सर्वांचे लक्ष वेधले.

Swapnil's point of view | स्वप्नीलची लक्षवेधी बाजी

स्वप्नीलची लक्षवेधी बाजी

मुंबई : स्वप्नील धोपडे आणि नितीन एस. या दोन्ही भारतीय इंटरनॅशनल मास्टर्स खेळाडूंनी धक्कादायक निकालाची नोंद करताना ८व्या मुंबई महापौर आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेत सर्वांचे लक्ष वेधले. या दोघांनी अनुक्रमे बेलारुसचा ग्रँडमास्टर अलेक्झांड्रोव अलेक्सेज आणि बांगलादेशनचा ग्रँडमास्टर झीओर रेहमान यांना नमवून स्पर्धेत खळबळ माजवली.
गोरेगाव स्पोटर््स क्लब येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत स्वप्नील विरुध्द खेळताना कसलेला अलेक्सेजने चांगलीच पकड मिळवली होती. मात्र यानादात थोडा ढिलाईपणा सोडल्याने त्याच्याकडून माफक चूक झाली व त्याचा पुरेपुर फायदा उचलताना स्वप्नीलने सगळा खेळच फिरवला. यानंतर लगेच नितीनने देखील अनपेक्षित निकाल लावताना रेहमानचा पाडाव केला. यामुळे स्पर्धे ग्रँडमास्टर खेळाडूंची इम्टरनॅशन मास्टर खेळाडूंविरुध्द असलेली पराभवांची मालिका देखील कायम राहिली.
या दिमाखदार विजयासह स्वप्नील व नितीन यांनी प्रत्येकी ७ गुणांसह द्वितीय स्थानावर झेप घेतली आहे.
त्याचवेळी दुसऱ्या बाजूला ग्रँडमास्टर आर. आर. लक्ष्मण आणि इंटरनॅशनल मास्टर प्रियदर्शन या भारतीयांसह युक्रेनचा ग्रँडमास्टर क्रावस्तिव मार्टिन यांनी देखील प्रत्येकी ६.५ गुणांनी आगेकूच केली आहे.
लक्ष्मण व मार्टिन या कसलेल्या खेळाडूंमध्ये झालेल्या लढतीत दोन्ही खेळाडूंनी कोणताही धोका न पत्करता केवळ १४ चालींमध्ये बरोबरी मान्य करीत गुण वाटून घेतला. प्रियदर्शनने देखील चमकदार खेळ करताना ग्रँडमास्टर झुबोव अलेक्झांडरला बरोबरी मान्य करण्यास भाग पाडले. (क्रीडा प्रतिनिधी)

श्रीराम सारजाचे ‘जलद’ वर्चस्व
पुणे : जलद बुद्धिबळ स्पर्धेत श्रीराम सारजा याने उत्कृष्ट कामगिरी करीत सर्वाधिक ७ गुणांसह विजेतेपद पटकावले. श्रीरामने अडखळत्या सुरुवातीनंतर स्पर्धेवर चांगलेच वर्चस्व राखले. आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या सहभागामुळे स्पर्धा चांगलीच चुरशीची झाली होती. अखेरच्या लढतीत विजेतेपद पटकावण्यासाठी बरोबरी देखील पुरेशी असलेल्या श्रीरामने निखिल दिक्षित विरुध्द निर्णायक लढतीत मोक्याच्यावेळी कोणताही धोका न पत्करता सामना बरोबरीत सोडवण्याचा निर्णय घेत विजेतपदावर शिक्का मारला. दरम्यान प्रतिक मुळेने देक्हील स्पर्धेत ७ गुणांची कमाई केली. मात्र श्रीरामने सरासरीच्या जोरावर बाजी मारली. निखिलने या दोघांनंतर ६.५ गुणांच्या कमाईसह छाप पाडली. तर आकांक्षा हगवणे, केतन खैरे, राहुल वर्मा आणि अथर्व गोडबोले यांनी प्रत्येकी ६ गुण मिळवताना विजेतेपदाच्या शर्यतीमध्ये चुरस निर्माण केली होती.
दरम्यान ८ वर्षांखालील गटामध्ये अद्वैत पाटील याने तर १० वर्षांखालील गटात श्रीश कुलकर्णी यांनी बाजी मारली. त्याचवेळी १२ वर्षांखालील गटामध्ये दिगंबर जैल आणि १४ वर्षांखालील गटात हेरंब भागवत ने वर्चस्व राखले. १६ वर्षांखालील चुरशीच्या झालेल्या गटामध्ये गौरव हगवणे याने चमक दाखवली. या स्पर्धेत ६४ खेळाडू सहभागी झाले होते. त्यातील ४८ खेळाडू हे आंतरराष्ट्रीय मानांकित होते.

Web Title: Swapnil's point of view

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.