शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
3
ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
4
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
5
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
6
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
7
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
8
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
9
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
10
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
11
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
12
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
13
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
14
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
15
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
16
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
17
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
18
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
19
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'

स्वप्निलला राज्य सरकारकडून २ कोटी! वडील सुरेश कुसाळेंच्या नाराजीनंतर मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 12:23 IST

स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करून कांस्य पदक पटकावून देशाचे नाव उंचावले.

ऑलिम्पिक २०२४ च्या स्पर्धेत स्वप्नील कुसाळे याने दमदार कामगिरी करून कांस्य पदक पटकावून देशाचे नाव उंचावले. मात्र, राज्य सरकारकडून त्याच्या बाबतीत दुजाभाव केला जात आहे. स्वप्निलला राज्य सरकारने किमान पाच कोटी रुपये जाहीर करावे. त्याला बालेवाडीत फ्लॅटची सुविधा उपलब्ध करून द्यावी, याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी स्वप्निलचे वडील सुरेश कुसाळे यांनी पत्रकार परिषदेत केली होती. आता राज्य सरकारने दोन कोटी रुपयाचा धनादेश स्वप्निलला सोपवला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. 

अजित पवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले की, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात उत्तम कामगिरी करीत स्वप्नील कुसाळे याने कांस्य पदक जिंकले. यानिमित्ताने अभिनंदनपर स्वप्निलला राज्य सरकारच्या वतीने २ कोटी रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

स्वप्निलचे वडील सुरेश कुसाळे म्हणाले होते की, स्वप्निलचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जमीन, दागिने विकले. आता त्याचे पुढील ध्येय २०२८ मधील ऑलिम्पिक स्पर्धेचे असून, त्याला सुवर्ण पदक जिंकायचे आहे. सध्या सरकारने कांस्यपदक विजेत्यांसाठी १ कोटी रुपये जाहीर केले आहेत. मात्र, खेळाचा खर्च पाहता ही रक्कम तोकडी आहे. भविष्यातील करिअरसाठी सरकारने स्वप्निलला मोठे आर्थिक पाठबळ द्यावे. 

कोण आहे स्वप्नील कुसाळे?स्वप्नील सुरेश कुसाळे या कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तरुणाने आपल्या मेहनतीच्या जोरावर ऑलिम्पिकपर्यंत मजल मारली. महाराष्ट्रातून पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंना महाराष्ट्र सरकारने पन्नास लाखांची मदत केली होती. स्वप्नील पुण्यातील बालेवाडी येथील क्रीडा संकुलात सराव करत असे. ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र ठरल्यानंतर तो दिल्ली येथील रेंजवर सरावासाठी गेला होता. स्वप्नील आपल्या सर्वोत्तम खेळांचे चांगले प्रदर्शन करून देशासाठी सुवर्ण पदक मिळवून देईल याची आम्हाला खात्री आहे असे उद्गार वडिल सुरेश कुसाळे (सर) व आई सरपंच अनिता सुरेश कुसाळे यांनी दैनिक लोकमतशी बोलताना काढले होते. मात्र, स्वप्निलला सोनेरी कामगिरी करता आली नसली तरी त्याने ऐतिहासिक कामगिरी केली. स्वप्निलच्या या यशाने कांबळवाडीचे गाव सर्वदूर पसरले. 

टॅग्स :swapnil kusaleस्वप्नील कुसाळेparis olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Maharashtraमहाराष्ट्र