शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

स्वप्ना बर्मनचे चंदेरी यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 02:59 IST

आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या स्वप्ना बर्मन हिला आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये मंगळवारी महिला हेप्टॅथलॉनमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

दोहा : आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या स्वप्ना बर्मन हिला आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये मंगळवारी महिला हेप्टॅथलॉनमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे, पदकाचा प्रबळ दावेदार जिन्सन जॉन्सनने पुरुषांच्या १५०० मीटर शर्यतीच्या अंतिम फेरीच्या काही वेळ आधी दुखापतीमुळे माघार घेतली.२२ वर्षीय स्वप्नाने सात स्पर्धांमध्ये एकूण ५९९३ गुण मिळवले व ती उज्बेकिस्तानच्या एकटेरिना वोर्निना (६१९८ गुण) नंतर दुसऱ्या स्थानी राहिली. अन्य भारतीय पूर्णिमा हेम्बराम ५५२८ गुणांसह पाचव्या स्थानी राहिली. स्वप्नाने गेल्या वेळी ५९४२ गुण घेत सुवर्ण पटकावले होते. तिने जकार्तामध्ये आशियाई खेळात ६०२६ गुण मिळवले होते. या रौप्य पदकानंतर भारताच्या खात्यात दोन सुवर्ण, चार रौप्य आणि पाच कांस्यपदक मिळवले. महिलांच्या ३ हजार मीटर स्टिपल चेसमध्ये पारुल चौधरीने १० मिनिट ३.४३ सेकंदाची सर्वोत्तम वेळ नोंदवली. ती पाचव्या स्थानावर होती.पुरुषांच्या १५०० मीटर शर्यतीत राऊंड एक हीटमध्ये काही वेळ आधी जॉन्सनने माघारीचा निर्णय घेतला. उपमुख्य प्रशिक्षक राधाकृष्णनन नायरने सांगितले की,‘जॉन्सन मांस पेशींच्या दुखापतीमुळे हैराण आहे. तपासणीनंतर त्याला ट्रॅकवर न उतरण्याचा सल्ला देण्यात आला.’ जॉन्सन याने सोमवारी ८०० मीटर फायनल्समध्ये आपला सहभाग नोंदवला नाही. त्याच्या नावावर ८०० मीटर आणि १५०० मीटरमध्ये राष्ट्रीय विक्रम आहे. (वृत्तसंस्था)