शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

डोपिंगमधील दोषी खेळाडूंच्या कोचचे निलंबन व्हावे

By admin | Updated: April 2, 2015 01:37 IST

डोपिंग हा खेळांना ग्रासलेला कर्करोग असल्याचे सांगून दिग्गज धावपटू मिल्खासिंग यांनी डोपिंगमध्ये अडकणारे खेळाडू, त्यांचे कोच

नवी दिल्ली : डोपिंग हा खेळांना ग्रासलेला कर्करोग असल्याचे सांगून दिग्गज धावपटू मिल्खासिंग यांनी डोपिंगमध्ये अडकणारे खेळाडू, त्यांचे कोच आणि डॉक्टरांवरही निलंबनाचा बडगा उगारणे आवश्यक असल्याचे मत नोंदविले आहे.‘फ्लाइंग शीख’ नावाने परिचित असलेले मिल्खा यांनी मुलांसाठी एका फिटनेस कार्यक्रमाची सुरुवात केली. या वेळी ते म्हणाले, ‘‘डोपिंग खेळातील कर्करोग आहे. सरकार आणि क्रीडा संघटनांनी याविरुद्ध कडक धोरण राबवावे. खेळाडूंप्रमाणे कोच आणि डॉक्टरांना निलंबित करण्यात यावे, कारण हा सर्व प्रकार त्यांच्याच देखरेखीत होतो.’’ भारताचे अनेक खेळाडू विशेषत: भारोत्तोलक डोपिंगमध्ये अडकले आहेत. केरळमध्ये अलीकडेच झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या वेळी काही खेळाडू डोपिंगमध्ये दोषी आढळले होते. यावर मिल्खा म्हणाले, ‘‘देशाला स्वातंत्र्य मिळून ६० वर्षे झाली, तरी दुसरा मिल्खा घडू शकला नाही याला दोषी भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघटना आहे. देशात सव्वाशे कोटी लोकांमध्ये दुसरा मिल्खा शोधता न येणे हे आमचे दुर्दैव आहे. याचा अर्थ आमचे खेळाडू, कोच आणि संघटना काम करण्यात कमी पडतात.’’१९६४च्या रोम आॅलिम्पिकमध्ये सेकंदाच्या थोड्या फरकाने पदकापासून वंचित राहिलेले ८६ वर्षांचे मिल्खासिंग यांनी आॅलिम्पिकमध्ये सुवर्णविजेता भारतीय धावपटू पाहणे ही ‘याचि देही याचि डोळा’ इच्छा असल्याचे मनोगत व्यक्त केले. (वृत्तसंस्था)