सुशील, साक्षी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत फायनलमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 20:25 IST2017-11-17T20:25:19+5:302017-11-17T20:25:19+5:30
आॅलिम्पिकमध्ये दोनदा पदक जिंकणारा आणि तीन वर्षांनंतर पुनरागमन करणारा दिग्गज मल्ल सुशील कुमारने राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिपच्या पुरुषांच्या ७४ किलो वजन गटातील फ्री स्टाइल शैलीत आज फायनलमध्ये धडक मारली.

सुशील, साक्षी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत फायनलमध्ये
इंदौर : आॅलिम्पिकमध्ये दोनदा पदक जिंकणारा आणि तीन वर्षांनंतर पुनरागमन करणारा दिग्गज मल्ल सुशील कुमारने राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिपच्या पुरुषांच्या ७४ किलो वजन गटातील फ्री स्टाइल शैलीत आज फायनलमध्ये धडक मारली.
महिला कुस्तीतील देशातील एकमेव आॅलिम्पिक पदक विजेत्या साक्षी मलिक आणि ‘दंगल गर्ल’ गीता फोगाटदेखील आपापल्या वजन गटात अंतिम फेरीत पोहोचल्या.
सुशीलने आपल्या चिरपरिचित अंदाजात सुरुवातीच्या दोन फेºयांतच प्रतिस्पर्ध्याला दोन मिनिटांपेक्षा कमी वेळेत धूळ चारली; परंतु उपांत्यपूर्व फेरी आणि उपांत्य फेरीत त्याला आव्हान मिळाले नाही. दोन्ही लढतीत त्याला पुढे चाल मिळाली.
सुशीलने पहिल्या फेरीत मिझोरामच्या लालमलस्वामा याला अवघ्या ४८ सेकंदात आणि दुसºया फेरीत मुकुल मिश्रा याला तेवढ्याच अवधीत चीत केले. उपांत्यपूर्व फेरीत त्याला प्रवीणने वॉकओव्हर दिला, तर उपांत्य फेरीत सचिन दहिया त्याच्याविरुद्ध मैदानातच उतरला नाही.
दरम्यान, गीताने ५९ किलो वजन गटात पिछाडीवर पडल्यानंतर मुसंडी मारत सरिता मोर हिला ८-४ ने धूळ चारली. साक्षीने ६२ किलो वजन गटात आपल्या प्रतिस्पर्ध्याला अवघ्या ३९ सेकंदात चीत केले.