सुशील कुमार राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये खेळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 03:19 IST2017-11-13T03:19:30+5:302017-11-13T03:19:56+5:30
भारताचा स्टार पहिलवान आणि ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार इंदूर येथे १५ ते १८ नोव्हेंबर दरम्यान होणार्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत खेळणार आहे. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य आणि लंडन ऑलिम् िपकमध्ये रौप्यपदक विजेता सुशील रेल्वेकडून या स्पर्धेत सहभागी होईल.

सुशील कुमार राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये खेळणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारताचा स्टार पहिलवान आणि ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार इंदूर येथे १५ ते १८ नोव्हेंबर दरम्यान होणार्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत खेळणार आहे. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य आणि लंडन ऑलिम् िपकमध्ये रौप्यपदक विजेता सुशील रेल्वेकडून या स्पर्धेत सहभागी होईल. रेल्वेकडून ७४ किलो वजन गटात कोण भाग घेणार यासाठी सुशील आणि दिनेश यांच्यात ट्रायल होणार होती. दिनेशने आपल्या वरिष्ठ पहिलवानासाठी वॉकओव्हर दिला. माजी राष्ट्रीय ज्युनियर चॅम्पियन दिनेशला ७४ किलो वजन गटात रेल्वेच्या ब संघात निवडण्यात आले होते. या स्पर्धेत रेल्वेचे दोन संघ सहभागी होणार आहेत. सुशील कुमार ब संघात तर प्रवीण राणा अ संघात रेल्वेचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
सुशील म्हणाला की, मी शारीरिक आणि मानसिकरीत्या आपली सर्वश्रेष्ठ लय प्राप्त करू शकलो.