शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
3
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
4
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
5
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
6
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
7
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
8
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
9
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
10
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
11
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
12
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
13
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
14
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
15
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
16
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
17
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
18
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
19
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
20
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!

सुर्यकुमारला रिट्विट भोवले

By admin | Updated: February 22, 2017 03:53 IST

नुकताच झालेल्या आंतरराज्य टी२० स्पर्धेत संघातून वगळण्यात आल्यानंतर त्याप्रकरणी ट्विटरवर आलेल्या एका मेसेजवर

मुंबई : नुकताच झालेल्या आंतरराज्य टी२० स्पर्धेत संघातून वगळण्यात आल्यानंतर त्याप्रकरणी ट्विटरवर आलेल्या एका मेसेजवर रिट्विट केल्याप्रकरणी मुंबईचा आक्रमक फलंदाज सुर्यकुमार यादवला मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) नोटिस पाठवून याप्रकरणी खुलासा मागितला आहे. गुणवान खेळाडू असूनही अनेकदा विविध वादांमुळे टीकेला सामोरे जावे लागणारा सुर्यकुमार आता नव्या वादात अडकला आहे. विशेष म्हणजे यामुळे आता, आगामी विजय हजारे आंतरराज्य एकदिवसीय स्पर्धेसाठीही त्याच्या निवडीवर टांगती तलवार आली आहे. सुर्यकुमारने केलेल्या कृत्याचे एमसीएने गांभिर्याने दखल घेतली असून त्याला संघटनेच्या व्यवस्थापकीय समितीच्या बैठकीत उपस्थित राहण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे, याप्रकरणी लेखी स्पष्टीकरणही त्याला द्यावे लागणार आहे. यानंतरच, मुंबईच्या एकदिवसीय संघातील त्याच्या निवडीबाबत अंतिम निर्णय होईल.नुकताच झालेल्या सय्याद मुश्ताक अली टी२० स्पर्धेतील कर्णधार आदित्य तरेच्या नेतृत्त्वाखालील मुंबई संघातून सुर्यकुमारला वगळले असल्याचा मेसेज स्तंभलेखक मकरंद वायंगणकर यांनी पोस्ट केला होता. यावर सुर्यकुमारने रिट्विट केले होते. यावरुन एमसीएने त्याला नोटिस पाठवली आहे. याबात एमसीएचे संयुक्त सचिव उन्मेश खानविलकर यांनी सांगितले की, ‘खेळाडूंना सोशल नेटवर्किंगवर संघनिवडीबाबत अशाप्रकारे चर्चा करण्याची परवानगी नाही. आम्ही त्याला बुधवारी व्यवस्थापकिय बैठकीमध्ये उपस्थित राहण्यास सांगितले असून याप्रकरणी २४ तासांमध्ये त्याच्याकडून खुलासा मागितला आहे. सुर्यकुमारची बाजू पुर्ण जाणून घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल.’तसेच, ‘गतवर्षी मुंबई रणजी संघातून उपांत्य सामन्यात जय बिस्ताला बाहेर बसविल्यानंतरही त्याने नाराजी जाहीर केली होती. याविषयी त्याला तोंडी सूचना देऊन बजावले होते. सुर्यकुमार नक्कीच चांगला खेळाडू आहे. परंतु, शिस्त महत्त्वाची असून एकदिवसीय संघातील त्याची निवड तूर्तास थांबवली आहे,’ असेही खानविलकर म्हणाले. (क्रीडा प्रतिनिधी)