सचिनच्या गुडघ्यावर लंडनमध्ये शस्त्रक्रिया
By Admin | Updated: July 6, 2016 19:42 IST2016-07-06T19:38:02+5:302016-07-06T19:42:09+5:30
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला स्टार खेळाडू सचिन तेंडुलकर याच्या गुडघ्यावर बुधवारी येथे एका इस्पितळात शस्त्रक्रिया करण्यात आली.

सचिनच्या गुडघ्यावर लंडनमध्ये शस्त्रक्रिया
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. ६ : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला स्टार खेळाडू सचिन तेंडुलकर याच्या गुडघ्यावर बुधवारी येथे एका इस्पितळात शस्त्रक्रिया करण्यात आली. सचिनने फेसबुकवर डाव्या पायाचे छायाचित्र टाकले आहे. पायवर पट्टी बांधलेली दिसत आहे. लवकरच बरा होईल, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली.
सचिन पुढे लिहितो,ह्यनिवृत्तीनंतरही जखमेमुळे काही त्रास जाणवत होता. पण त्यातून लवकरच सावरून पुढील काम सुरू करणार आहे. गुडघ्यावर शस्त्रक्रिया करून घेतल्यानंतर सध्या विश्रांती घेत आहे. सचिनच्या या पोस्टवर १७ हजारावर चाहत्यांनी लाईक करीत आश्चर्य व्यक्त केले शिवाय त्याच्याप्रती संवेदना दर्शविल्या.