वन-डे मालिकेत सुरेश रैना, शमीचा जलवा
By Admin | Updated: September 7, 2014 00:04 IST2014-09-07T00:04:31+5:302014-09-07T00:04:31+5:30
नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या वन-डे मालिकेत ३-१ ने वर्चस्व गाजवणार्या भारतीय संघातील स्टार फलंदाज सुरेश रैना आणि वेगवान गोलंदाज मोहंमद शमी यांनी स्पर्धेत प्रभावी खेळ करून सर्वांचे लक्ष वेधले़

वन-डे मालिकेत सुरेश रैना, शमीचा जलवा
न ी दिल्ली : इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या वन-डे मालिकेत ३-१ ने वर्चस्व गाजवणार्या भारतीय संघातील स्टार फलंदाज सुरेश रैना आणि वेगवान गोलंदाज मोहंमद शमी यांनी स्पर्धेत प्रभावी खेळ करून सर्वांचे लक्ष वेधले़ सुरैश रैनाने या पाच सामन्यांच्या वन-डे मालिकेत अष्टपैलू कामगिरी केली़ त्याने ५३़३३ च्या सरासरीने १६० धावा केल्या़ त्याचबरोबर गोलंदाजीतही कमाल करताना त्याने १९़२५ च्या सरासरीने ४ गडीही बाद केले़ त्यात एका शतकाचाही समावेश होता़ याच कामगिरीमुळे रैना मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला़ दुसरीकडे गोलंदाजीत भारताच्या मोहंमद शमी याने प्रतिस्पर्धी खेळाडूंवर दबदबा राखला़ शमीने या वन-डे मालिकेत ३२़१ षटके गोलंदाजी करताना १५२ धावांच्या बदल्यात ८ गडी बाद केले़ त्याने ३/२८ ही सर्वोत्कृष्ट कामगिरी होती़ फलंदाजीत भारताकडून अजिंक्य रहाणे याने ४८ च्या सरासरीने १९२ धावा केल्या, तर इंग्लंडकडून ज्यो रूट याने ४०़५७ च्या सरासरीने १६३ धावांचे योगदान दिले, तसेच क्रिस वोक्स याने ३९़२० च्या सरासरीने ५ गडी बाद करण्यात यश मिळविले़ वन-डे मालिकेत अम्बाती रायडू याने ३ सामन्यांत ११७ च्या सरासरीने १७७ धावा केल्या़ रवींद्र जडेजा याने ४ सामन्यांत १०८ च्या सरासरीने १०८, तर शिखर धवन याने ४ लढतींत ५१ च्या सरासरीने १५५ धावांचे योगदान दिले़ इंग्लंडच्या रूटने ४ सामन्यांत २९़५० च्या सरासरीने १६३ आणि जोस बटलर याने ४ लढतींत २६ च्या सरासरीने १०४ धावा केल्या़ गोलंदाजीत भारताच्या रवींद्र जडेजा याने ३६ षटकांत १९ च्या सरासरीने ७ गडी बाद केले़ आऱ आश्विनने ३९़१ षटकांत २४़८५ च्या सरासरीने ७ विकेटस् मिळविल्या़ भुवनेश्वर कुमारने २५ षटकांत २६़८० च्या सरासरीने ५ बळी मिळविले़ इंग्लंडच्या बेन स्टोक्स याने २० षटकांत ३३ च्या सरासरीने ४, तर मोईन अली याने १५ षटके गोलंदाजी करताना २ विकेटस् मिळविल्या़ (वृत्तसंस्था)