चॅपेल यांचे कोहलीला समर्थन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 01:21 IST2017-07-24T01:21:00+5:302017-07-24T01:21:00+5:30

आॅस्ट्रेलियन दिग्गज इयान चॅपेल यांनी प्रशिक्षक कुंबळेसोबतच्या वादात भारतीय कर्णधार विराट कोहली याचे समर्थन केले आहे.

Support for Chappell Kohli | चॅपेल यांचे कोहलीला समर्थन

चॅपेल यांचे कोहलीला समर्थन

नवी दिल्ली : आॅस्ट्रेलियन दिग्गज इयान चॅपेल यांनी प्रशिक्षक कुंबळेसोबतच्या वादात भारतीय कर्णधार विराट कोहली याचे समर्थन केले आहे. कोहलीमुळे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना त्यांचे पद गमवावे लागले होते.
चॅपेल यांनी ईएसपीएन क्रिकइन्फो’मध्ये आपल्या स्तंभात संघात प्रशिक्षकाची भूमिका महत्त्वाची नसल्याचे मानले आहे.
त्यांनी लिहिले, रवी शास्त्री क्रिकेट संचालक असताना त्यांच्याशी जसे नाते कोहलीचे होते तसे नाते अनिल कुंबळे सोबत नव्हते. आता भारताने शास्त्री यांची प्रशिक्षकपदी निवड केली आहे त्यामुळे आता प्रश्नच उद्भवत नाही.’’ कुंबळेने गेल्या महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. कोहलीसोबतचे संबंध ‘अस्थिर’ झाल्याचे त्याने मान्य केले होते. कोहलीने या वादावर अद्यापही कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.’’ (वृत्तसंस्था)

Web Title: Support for Chappell Kohli