सुनील, हरमनप्रीत सर्वोत्कृष्ट हॉकीपटू
By Admin | Updated: March 31, 2017 00:42 IST2017-03-31T00:42:41+5:302017-03-31T00:42:41+5:30
भारताचा आघाडीचा फॉरवर्ड एस. व्ही. सुनील व युवा ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीतसिंग यांना आशियाई हॉकी

सुनील, हरमनप्रीत सर्वोत्कृष्ट हॉकीपटू
मस्कत : भारताचा आघाडीचा फॉरवर्ड एस. व्ही. सुनील व युवा ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीतसिंग यांना आशियाई हॉकी महासंघातर्फे २०१६ चा सर्वोत्कृष्ट खेळाडू व सर्वोत्कृष्ट प्रतिभावान खेळाडू म्हणून गौरविण्यात आले आहे.
आशियातील राष्ट्रीय संघांच्या कोचेसकडून पुरस्कारासाठी नामांकन मागविण्यात आले होते. यासाठी वर्षभरातील कामगिरीचा निकष ठरविण्यात आला होता. हरमनप्रीतचा समावेश असलेल्या भारताच्या ज्युनियर संघाने हॉकी विश्वचषकात जेतेपद पटकवले होते. सध्या तो भारताच्या सिनियर संघात आहे.सुनीलने गतवर्षी लंडनमधील एफआयएच चॅम्पियन्स चषकात मोलाची भूमिका बजावली होती. जागतिक हॉकीत सर्वांत वेगवान फॉरवर्डमध्ये सुनीलची गणना होते.