सुनील गावसकर अपघातातून बचावले

By Admin | Updated: August 13, 2014 01:34 IST2014-08-13T01:34:26+5:302014-08-13T01:34:26+5:30

गावसकर स्काय स्पोर्टस्साठी कसोटी सामन्यांत समालोचन करण्यासाठी मँचेस्टरला गेले होते़ त्यानंतर मँचेस्टरहून परतताना हा अपघात घडला़

Sunil Gavaskar escaped from the accident | सुनील गावसकर अपघातातून बचावले

सुनील गावसकर अपघातातून बचावले

लंडन : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि सध्या समालोचकाची भूमिका निभावणारे सुनील गावसकर मँचेस्टरहून लंडनला जाताना झालेल्या एका अपघातातून बालंबाल बचावले़ भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी संपल्यानंतर ते मँचेस्टरहून कारमध्ये लंडनला जात होते, तेव्हा हा अपघात घडला़
गावसकर स्काय स्पोर्टस्साठी कसोटी सामन्यांत समालोचन करण्यासाठी मँचेस्टरला गेले होते़ त्यानंतर मँचेस्टरहून परतताना हा अपघात घडला़ त्यांच्यासोबत समालोचक मार्क निकोलस आणि त्यांचा खास मित्र चंद्रेश पटेलसुद्धा जग्वार या गाडीमध्ये बसलेला होता़ अपघात झाला त्यावेळी गावसकर हे मागच्या सीटवर बसले होते, तर निकोलस ड्रायव्हरच्या बाजूला असलेल्या पुढच्या सीटवर बसलेले होते़ समोरून येणाऱ्या एका कारने जग्वारला जोरदार धडक दिली़ गावसकर यांच्या ड्रायव्हरला झोप लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़ त्याने जर वेळीच खबरदारी घेतली असती, तर अपघातापासून वाचता आले असते़ (वृत्तसंस्था)

Web Title: Sunil Gavaskar escaped from the accident