Sunil Chhetri, Indian Football: शिलॉग: दिग्गज फुटबॉलपटू सुनील छेत्रीने आंतररष्ट्रीय निवृत्ती मागे घेत दिमाखदार पुनरागमन केले. त्याने भारताच्यामालदीवविरुद्धच्या शानदार विजयात एक गोल करत आपला दर्जा पुन्हा एकदा दाखवून दिला. बुधवारी झालेल्या मैत्री सामन्यात भारतानेमालदीवला ३-० असे नमवले.
या शानदार विजयासह भारताची सलग १२ सामन्यांपासून सुरू असलेली पराभवाची मालिकाही खंडीत झाली. भारताने आक्रमक खेळ करत मालदीवला दडपणात ठेवले. ३५ व्या मिनिटाला राहुल भेकेने शानदार गोल करत आघाडी मिळवून दिल्यानंतर लिस्टन कोलाको याने ६६ व्या मिनिटाला गोल करत भारताची आघाडी २-० अशी भक्कम केली. यानंतर ४० वर्षीय छेत्रीने अप्रतिम कौशल्य सादर करताना ७७ व्या मिनिटाला गोल करत भारताचा विजय स्पष्ट केला. हा छेत्रीचा ९५ वा आंतरराष्ट्रीय गोल ठरला.
हा भारताचा गेल्या १६ सामन्यांतील पहिला विजय ठरला, हे विशेष. याआधी भारताने नोव्हेंबर २०२३ मध्ये २०२६ सालच्या फिफा विश्वचषक पात्रता फेरी सामन्यात कुवेतविरुद्ध १-० असा आपला अखेरचा विजय मिळवला होता.