सुंदर रमण यांचेही समर्थन

By Admin | Updated: November 19, 2014 04:16 IST2014-11-19T04:16:35+5:302014-11-19T04:16:35+5:30

सर्वोच्च न्यायालयातर्फे गठित चौकशी समितीने आयपीएल फिक्सिंग प्रकरणामध्ये ‘क्लीन चिट’ दिलेले अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची बीसीसीआयने पाठराखण केली

Sunder Raman's support | सुंदर रमण यांचेही समर्थन

सुंदर रमण यांचेही समर्थन

चेन्नई : सर्वोच्च न्यायालयातर्फे गठित चौकशी समितीने आयपीएल फिक्सिंग प्रकरणामध्ये ‘क्लीन चिट’ दिलेले अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची बीसीसीआयने पाठराखण केली. तसेच चौकशी अहवालामध्ये सट्टेबाजांसोबत संपर्क साधल्याचा आरोप असलेले आयपीएलचे सीईओ सुंदर रमण यांचेही समर्थन केले आहे.
बीसीसीआयने आपल्या पत्रकारत स्पष्ट केले की, ‘कार्यकारिणीने बीसीसीआयची ८५ वी वार्षिक आमसभा स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार एजीएम२० नोव्हेंबर रोजी होणार होती. आता नव्या कार्यक्रमानुसार एजीएम १७ डिसेंबर रोजी चेन्नईतील पार्क शेरटनमध्ये होणार आहे.’ दुसरीकडे, बीसीसीआयने श्रीनिवासन यांची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकीमध्ये सदस्यांनी मुद््गल समितीच्या अंतिम अहवालातील निष्कर्षावर चर्चा केली. श्रीनिवासन यांच्याकडून काहीच चूक घडली नसल्याचे स्पष्ट झाले. काही समाजविरोधी घटकांनी त्यांच्यावर केलेले आरोप आधारहीन असून, त्यांचा उद्देश बीसीसीआयच्या कार्याला खोडा घालण्याचे आहे.’
मुद््गल समितीच्या अहवालामध्ये खेळाडू आचारसंहितेचे उल्लंघन करीत असल्याची माहिती असताना त्यांनी त्याच्याविरुद्ध कारवाई केली नसल्याच्या प्रकरणात दोषी ठरविले. या व्यतिरिक्त श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन आणि राजस्थान रॉयल्सचे सहमालक राज कुंद्रा यांना सट्टेबाजी प्रकरणात दोषी ठरविताना संघामध्ये त्यांची भूमिका असल्याचे स्पष्ट केले. समितीच्या अहवालामध्ये मयप्पन चेन्नई सुपरकिंग्जचे अधिकारी असल्याचे म्हटले आहे तर राजस्थान रॉयल्सचे मालक कुंद्रा यांनी बीसीसीआय-आयपीएलच्या भ्रष्टाचारविरोधी संहितेचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे.
(विशेष प्रतिनिधी)

Web Title: Sunder Raman's support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.