सुमेधकुमारचा डबल गोल्डन धमाका
By Admin | Updated: September 29, 2015 23:21 IST2015-09-29T23:21:29+5:302015-09-29T23:21:29+5:30
महाराष्ट्राच्या सुमेधकुमार देवळालीवाला अचूक नेम साधत दिल्ली येथे सुरू असलेल्या आठव्या एशियन चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेत डबल गोल्डन धमाका केला.

सुमेधकुमारचा डबल गोल्डन धमाका
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सुमेधकुमार देवळालीवाला अचूक नेम साधत दिल्ली येथे सुरू असलेल्या आठव्या एशियन चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेत डबल गोल्डन धमाका केला.
औरंगाबादच्या या प्रतिभावान नेमबाजाने नवी दिल्ली येथील या स्पर्धेत १० मीटर एअर पिस्टल पुरुषांच्या ज्युनिअर गटात वैयक्तिक आणि सांघिक असे दुहेरी सुवर्णयश मिळवले. सुमेधकुमार देवळालीवाला याने १० मीटर एअर पिस्टलच्या क्वालिफिकेशन राऊंडमध्ये ६०० पैकी ५७६ स्कोअर करून फायनलमध्ये दिमाखात धडक मारली. फायनल राऊंडमध्ये तर त्याने त्याची कामगिरी कमालीची उंचावताना २०० पैकी १९९.१ गुण मिळवताना भारताला वैयक्तिक तसेच सांघिक सुवर्णपदक जिंकून दिले. रौप्यपदक भारताच्याच राजस्थान येथील हेमेंद्र खुशवाह याने मिळवले. कास्यपदक बांगलादेशच्या मोहंमद अहमद याने पटकावले. सुमेधकुमार देवळालीवाला याने हेमेंद्र खुशवाह, अचलप्रतापसिंग गरेवाल यांच्या साथीने भारताला १० मीटर एअर पिस्टलमध्येही सांघिक सुवर्णपदक जिंकून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले.