सुखदेव धुर्वे सत्कार
By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:16+5:302014-12-12T23:49:16+5:30
सागरी जलतरणपटू धुर्वेचा गौरव

सुखदेव धुर्वे सत्कार
स गरी जलतरणपटू धुर्वेचा गौरवनागपूर : सागरी किनारा नसलेल्या नागपुरातील विपरीत परिस्थितीवर मात करीत लांब पल्ल्याच्या जलतरणात स्वत:च्या नावाची मोहोर उमटविणारा नागपूर पोलीस दलातील कॉन्स्टेबल सुखदेव धुर्वे याने मुंबई हल्ल्याच्या स्मृतिदिनी शहिदांना मानवंदना म्हणून एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडिया हा १९ किमी अंतराचा प्रवास २ तास ५० मिनिटांत पोहून पूर्ण केला.यापूर्वी धरमतर खाडी, रामेश्वर खाडी आणि जिब्राल्टर खाडी पोहून जाण्यात यशस्वी ठरलेल्या सुखदेवने आता इंग्लिश खाडी पोहून जाण्याचा निर्धार केला आहे. त्याचा उत्साह वाढविण्यासाठी महापौर प्रवीण दटके आणि माजी महापौर मायाताई इवनाते यांनी घरी जाऊन सुखदेवचा सत्कार केला. सौ. वैशाली धुर्वे यांना त्यांनी वृक्ष भेट दिले. यावेळी क्रीडा उपसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे, डॉ. संभाजी भोसले, अमित कोवे, नीलेश काळे, आशिष काळे यांची उपस्थिती होती.(क्रीडा प्रतिनिधी)