सुधाने स्टीपलचेसमध्ये राष्ट्रीय विक्रम तोडला
By Admin | Updated: May 15, 2016 04:29 IST2016-05-15T04:29:29+5:302016-05-15T04:29:29+5:30
रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या सुधा सिंह हिने आज येथे प्रतिष्ठित डायमंड लीगच्या दुसऱ्या सत्रात महिलांच्या ३000 मीटर स्टीपलचेसमध्ये राष्ट्रीय विक्रम मोडला आणि ती आठव्या स्थानावर राहिली.

सुधाने स्टीपलचेसमध्ये राष्ट्रीय विक्रम तोडला
शांघाई : रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या सुधा सिंह हिने आज येथे प्रतिष्ठित डायमंड लीगच्या दुसऱ्या सत्रात महिलांच्या ३000 मीटर स्टीपलचेसमध्ये राष्ट्रीय विक्रम मोडला आणि ती आठव्या स्थानावर राहिली.
गेल्या महिन्यात नवी दिल्लीत फेडरेशन कप राष्ट्रीय अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपदरम्यान रिओसाठी पात्र ठरणाऱ्या सुधाने ९ मिनिटे २६.५५ सेकंद वेळ नोंदवताना याआधीचा ९ मिनिटे २७.0९ सेकंद वेळेचा राष्ट्रीय विक्रम मोडला. हा विक्रम आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या ललिता बाबरच्या नावावर होता. ललितानेदेखील आज शर्यतीत सहभाग घेतला आणि ९ मिनिटे ४३.३0 सेकंद या निराशाजनक वेळेसह ती १४ खेळाडूंत १३ वी आली. गेल्या वर्षी विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये आठव्या स्थानी राहिलेल्या ललिताने फेडरेशनकपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते आणि राष्ट्रीय विक्रम केला होता.