शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
2
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
3
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
4
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
5
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
6
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
7
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
8
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
9
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
10
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
11
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
12
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
13
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
14
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
15
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
16
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
17
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
18
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
19
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
20
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी

सरकार, हितधारकांच्या पाठिंब्यामुळे पॅरालिम्पिकमध्ये मिळाले यश !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 05:09 IST

काही पदके थोड्या फरकाने हुकली, पण नेमबाज स्वरूप उन्हाळकर, ॲथलिट संदीप चौधरी, सोमण राणा आणि नवदीप तसेच बॅडमिंटनपटू तरुण ढिल्लन सकीना खातून (पॉवरलिफ्टिंग), राम पाल आणि अमित सरोहा (ॲथ्लेटिक्स) आणि राहुल जाखड (नेमबाजी) यांनी कौतुकास्पद कामगिरी केली.

ठळक मुद्देकाही पदके थोड्या फरकाने हुकली, पण नेमबाज स्वरूप उन्हाळकर, ॲथलिट संदीप चौधरी, सोमण राणा आणि नवदीप तसेच बॅडमिंटनपटू तरुण ढिल्लन सकीना खातून (पॉवरलिफ्टिंग), राम पाल आणि अमित सरोहा (ॲथ्लेटिक्स) आणि राहुल जाखड (नेमबाजी) यांनी कौतुकास्पद कामगिरी केली.

दीपा मलिक

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये पाच सुवर्ण आणि आठ रौप्यासह भारताने अभूतपूर्व १९ पदके जिंकली. त्यामुळे माझ्या आनंदाला उधाण आले आहे. नऊ प्रकारात ५४ खेळाडू पाठविण्यात आले तेव्हापासूनच यंदा सर्वोत्तम कामगिरीची मला खात्री होती. १९६८ ला पॅरालिम्पिक सुरू झाल्यापासून २०१६ च्या रिओ आयोजनापर्यंत आमच्या खेळाडूंनी केवळ १२ पदके जिंकली होती. यंदा १९ पदके जिंकून १६२ देशांमध्ये भारत २४व्या स्थानी आला.त्यातही अविस्मरणीय कामगिरीसह पदकांची कमाई केली. सुमित अंतिलने भालाफेकीत विश्वविक्रमासह सुवर्ण, अवनी लेखराने विश्व विक्रमाची बरोबरी करीत सुवर्ण, तर मनीष नरवालने पिस्तूल प्रकारात विक्रमी सुवर्ण पटकविले. निषाद कुमार आणि प्रवीण कुमार यांनी उंच उडीत आशियाई विक्रम प्रस्थापित केले.

काही पदके थोड्या फरकाने हुकली, पण नेमबाज स्वरूप उन्हाळकर, ॲथलिट संदीप चौधरी, सोमण राणा आणि नवदीप तसेच बॅडमिंटनपटू तरुण ढिल्लन सकीना खातून (पॉवरलिफ्टिंग), राम पाल आणि अमित सरोहा (ॲथ्लेटिक्स) आणि राहुल जाखड (नेमबाजी) यांनी कौतुकास्पद कामगिरी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा स्वतः मार्ग दाखवतात, तेव्हा खेळाडूंचे काम सोपे होते. टोकियोकडे रवाना होण्याआधी मोदींनी दोन तास खेळाडूंशी संवाद साधला. पदक जिंकल्यानंतर प्रत्यक्ष बोलून पाठ थोपटली. सर्वोच्च नेतृत्वाकडून, असे प्रोत्साहन मिळणे खेळाडूच्या यशात मोठी भूमिका बजावते.भारतीय खेळाडूंनी हा चमत्कार कसा केला, याबाबत मला वारंवार विचारणा झाली. मी म्हणेन,‘भारत सरकार, पॅरालिम्पिक समिती, पॅरा स्पोर्टसला समर्थन देणारे, राष्ट्रीय क्रीडा महासंघ आणि निमशासकीय संघटना यांच्यातील झालेल्या बदलाचा आणि योग्य समन्वयाचा हा परिणाम आहे.’ पीसीआयमध्ये आम्ही खेळाडूंना केंद्रस्थानी ठेवून काम केले. 

२०१६च्या पॅरालिम्पिकची पदक विजेती म्हणून खेळाडूला सर्वोच्च प्राधान्य दिल्यास सकारात्मक निकाल येऊ शकतात हे मी अनुभवातून सिद्ध केले. रिओमध्ये चार पदके मिळाल्यापासून पॅरास्पोर्ट्सकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलला. दिव्यांग खेळाडू क्षमतेच्या बळावर काहीही करू शकतात, अनेकजण सशक्त व्यासपीठ म्हणून आमच्या खेळाकडे पाहू लागले. धोरणे अधिक सर्वसमावेशक झाली. भारतीय क्रीडा प्राधिकरणाला क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाचा पाठिंबा लाभला. खेळाडूंनी कशाचीही काळजी न करता तयारीवर लक्ष केंद्रित करावे याची खात्री पटली. कोरोनामुळे मर्यादा असताना सरकारने आमच्या तयारीसाठी कुठलीही कसर शिल्लक राखली नाही. भारतात आता पॅरालिम्पिकचे नवे पर्व सुरू झाले, हे मी आत्मविश्वासाने सांगू शकते. टोकियो २०२० ही केवळ सुरुवात आहे.  

टॅग्स :Paralympic Gamesपॅरालिम्पिक स्पर्धाIndiaभारतGoldसोनं