विद्यार्थ्याचा आॅलिम्पिक चॅम्पला धक्का
By Admin | Updated: September 22, 2014 04:20 IST2014-09-22T04:20:42+5:302014-09-22T04:20:42+5:30
यजमान दक्षिण कोरियाचा १७ वर्षीय शालेय विद्यार्थी किम चिओंग योंग याने आशियाई स्पर्धेत मोठा उलटफेर करताना आपल्याच देशाचा आॅलिम्पिक आणि विश्वचॅम्पियन जिन

विद्यार्थ्याचा आॅलिम्पिक चॅम्पला धक्का
इंचियोन : यजमान दक्षिण कोरियाचा १७ वर्षीय शालेय विद्यार्थी किम चिओंग योंग याने आशियाई स्पर्धेत मोठा उलटफेर करताना आपल्याच देशाचा आॅलिम्पिक आणि विश्वचॅम्पियन जिन जोंगला धूळ चारून नेमबाजीत १० मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णपदकावर आपले नाव कोरले़
नेमबाजीत किम याने २०१़२ असा स्कोअर मिळवून सुवर्णावर नेम साधला़ चीनच्या पेंग वेईने १९९़३ स्कोअरसह रौप्यपदक मिळविले, तर जिन जोंगला १७९३ गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले़ किम योंग याने सांगितले की, मी जिन जोंगला माझा आदर्श मानतो़ त्यांच्याच विरुद्ध मिळविलेल्या यशामुळे मी आनंदित आहे़ अशीच कामगिरी यापुढेही सुरूच ठेवायची आहे़
यूएई ज्यूदो टीम स्पर्धेतून बाहेर
आशियाई आॅलिम्पिक परिषदेने (ओसीए) संयुक्त अरब अमिरातच्या (यूएई) तीन ज्यूदोपटूंना अपात्र ठरवून ज्यूदो टीमला आशियाई स्पर्धेतून बाहेर केले आहे़
आशियाई स्पर्धेत सहभाग घ्यायचा असेल तर खेळाडूंनी कमीत कमी तीन वर्षे आशियामध्ये निवास करणे गरजेचे आहे़ मात्र, मिहेल मार्चितन, इवान रोमरेन्सो आणि विकअर स्कोर्वटोव्हा या खेळाडंूनी नियमांचे पालन केले नाही़ त्यामुळे त्यांना स्पर्धेत बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला़