बॉक्सिंग फेडरेशनची पुनर्वसनासाठी धडपड

By Admin | Updated: August 4, 2015 00:38 IST2015-08-04T00:38:14+5:302015-08-04T00:38:14+5:30

आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाकडून निलंबन (एआयबीए) होताच एकाकी पडलेल्या भारतीय हौशी बॉक्सिंग महासंघाने (आयएबीएफ) सध्या उद्भवत असलेले

The struggle for rehabilitation of the boxing federation | बॉक्सिंग फेडरेशनची पुनर्वसनासाठी धडपड

बॉक्सिंग फेडरेशनची पुनर्वसनासाठी धडपड

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाकडून निलंबन (एआयबीए) होताच एकाकी पडलेल्या भारतीय हौशी बॉक्सिंग महासंघाने (आयएबीएफ) सध्या उद्भवत असलेले प्रशासकीय अडथळे संपविण्यासाठी क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांची भेट घेण्याचे ठरविले आहे.
एआयबीएफला एआयबीएने निवडणुकीतील अफरातफरीचा फटका ठेवून २०१३ मध्ये निलंबित केले. त्यानंतर लगेचच क्रीडा मंत्रालयानेदेखील या संघटनेवर निलंबन बजावले. तथापि ही संस्था अद्याप आयओएची मान्यताप्राप्त राष्ट्रीय क्रीडा संघटना आहे. एआयबीएफचे महासचिव राजेश भंडारी म्हणाले, ‘‘या खेळाचे अतोनात नुकसान होत असल्याने सर्व घटकांना एकत्र बोलावून सर्वसंमत तोडगा काढण्याची विनंती करण्यासाठी आम्ही सोनोवाल यांची भेट घेण्याचे ठरविले आहे.’’
एआयबीएफच्या निलंबनानंतर बॉक्सिंग इंडियाने देशातील बॉक्सिंगची सूत्रे स्वत:कडे घेतली होती. पण या संस्थेतील मतभेद चव्हाट्यावर आले. राज्य संघटनांनी बॉक्सिंग इंडियाचे अध्यक्ष संदीप जाजोदिया आणि महासचिव जय कवळी यांना बाहेरचा रस्ता दाखविला. बॉक्सिंगची सूत्रे सध्या एआयबीएकडून जाहीर करण्यात आलेल्या अस्थायी समितीकडे आहेत.
अस्थायी समितीचे प्रमुख भारतातील एआयबीएचे प्रतिनिधी किशन नर्सी आहेत. समितीत साईचे महासंचालक इंजेती श्रीनिवास यांचाही समावेश आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: The struggle for rehabilitation of the boxing federation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.