बलाढ्य यू मुंबाचा विजयी धडाका कायम

By Admin | Updated: August 15, 2015 23:48 IST2015-08-15T23:48:36+5:302015-08-15T23:48:36+5:30

प्रो कबड्डीच्या दुसऱ्या सत्रात तुफान फॉर्ममध्ये असलेल्या बलाढ्य यू मुंबा संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखताना तगड्या पटणा पायरेट्सला ३२-२७ असे लोळवले.

Strong Yu Mamba's winning streak continued | बलाढ्य यू मुंबाचा विजयी धडाका कायम

बलाढ्य यू मुंबाचा विजयी धडाका कायम

बंगळुरु : प्रो कबड्डीच्या दुसऱ्या सत्रात तुफान फॉर्ममध्ये असलेल्या बलाढ्य यू मुंबा संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखताना तगड्या पटणा पायरेट्सला ३२-२७ असे लोळवले. सुरुवातीला एकतर्फी झालेल्या या सामन्यात मध्यंतरानंतर पायरेट्सने कडवी झुंज दिली. मात्र मुंबईकरांच्या धडाक्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही.
बंगळुरुच्या श्री कांतीरवा स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात यू मुंबाने आक्रमण व बचाव याचा योग्य ताळमेळ साधताना एकहाती वर्चस्व राखले. स्पर्धेची बाद फेरी गाठण्यासाठी विजय आवश्यक असलेल्या पटणा पायरेट्स संघाचे खेळाडू संपुर्ण सामन्यात मुंबईकरांसमोर चाचपडताना दिसले. आक्रमक खेळ केलेल्या यू मुंबाने पायरेट्सवर दोन लोण चढवले. तर पायरेट्सने मुंबईकरांवर एकदा लोण चढवून सामन्यात पुनरागमन करण्याचा अपयशी प्रयत्न केला.
मध्यंतराला मुंबईकरांनी १५-१२ अशी आघाडी घेऊन सामन्यावर पकड घेतली होती. हीच आघाडी अखेरपर्यंत टिकवून ठेवताना यू मुंबाने शानदार बाजी मारली. दुसऱ्या सत्रात पटणाच्या संघाने पिछाडी भरुन काढण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र खोलवर चढाई करण्याच्या नादामध्ये मुंबईकरांच्या भक्कम बचावफळीचा ते सहज शिकार ठरले. यामुळे दबावाखाली आलेल्या पायरेट्सचे सामन्यावरील नियंत्रण सुटू लागले. ३९व्या मिनीटाला पायरेट्सने मुंबईवर लोण चढवून २७-२९ अशी पिछाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतर लगेच मुंबईकरांनी सलग ३ गुणांची कमाई करुन पायरेट्सची हवा काढली. तर सामन्याच्या अखेरच्या चढाईमध्ये कर्णधार अनुप कुमारने केवळ टाईमपास करुन मुंबईच्या विजयावर शिक्का मारला. मुंबईकडून अनुपचे आक्रमण व सुरेंद्र नाडा, मोहित चिल्लर यांचे बचाव निर्णायक ठरले. गिरीश एर्नाक व गुरविंदर सिंगने पायरेट्सकडून अपयशी झुंज दिली.

प्रो-कबड्डी २0१५ साखळी गुणतक्ता
संघाचे नाव सामने विजयी पराभूत गुण
यू मुंबा१२१११५५
तेलुगू टायटन्स१२७२४५
बंगळुरु बुल्स१२७५३८
जयपूर पिंक पॅँथर्स१२६५३६
पटणा पायरेट्स१२५६३१
दबंग दिल्ली१३४८२६
बंगाल वॉरियर्स१३३९२२
पुणेरी पलटण१०१८१४

Web Title: Strong Yu Mamba's winning streak continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.