शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

न्यूझीलंडचा जोरदार सराव

By admin | Updated: March 11, 2016 03:40 IST

धडाकेबाज कॉलिन मुन्रो (६७) आणि कोरी अँडरसन (६०) यांच्या तुफानी फटकेबाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर न्यूझीलंडने टी-२० विश्वचषक सराव सामन्यात

मुंबई : धडाकेबाज कॉलिन मुन्रो (६७) आणि कोरी अँडरसन (६०) यांच्या तुफानी फटकेबाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर न्यूझीलंडने टी-२० विश्वचषक सराव सामन्यात श्रीलंकेविरुद्ध ७४ धावांनी सहज विजय मिळवला.वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करून निर्धारित षटकात लंकेसमोर २२७ धावांचे कठीण आव्हान ठेवले. या भल्यामोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव २० षटकांत ७ बाद १५२ धावा असा रोखला गेला. पहिल्या डावात गोलंदाजी सपशेल अपयशी ठरल्यानंतर लंकेची फलदाजीही फारशी चमकदार ठरली नाही. लाहिरु थिरीमाने (२९ चेंडूत ४१ धावा) व चमारा कपुगेदरा (२७ चेंडूत ३८ धावा) यांनी लंकेकडून फटकेबाजीचा प्रयत्न केला. तर अ‍ॅडम मिल्ने (३/२६) आणि ईश सोधी (२/१९) यांनी लंकेच्या फलंदाजांना जखडवून ठेवले.तत्पूर्वी श्रीलंकेच्या मर्यादा किवी फलंदाजांनी स्पष्ट करताना ५ फलंदाजांच्या मोबदल्यात २२६ धावांचा डोंगर उभारला. कर्णधार केन विलियम्सन लवकर बाद झाल्यानंतर मार्टिन गुप्टील आणि मुन्रो यांनी ४१ धावांची वेगवान भागीदारी केली. गुप्टील २५ चेंडूत ७ चौकार व एका षटकारासह ४१ धावा काढून बाद झाला. यानंतर मुन्रोने कोरी अँडरसनसह ९१ धावांची वेगवान भागीदारी केली. मुन्रोने दासून शनाका टाकत असलेल्या १०व्या षटकांतील पहिल्या चार चेंडंूवर षटकार खेचून तुफानी हल्ला केला. तर दुसरीकडे आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या अँडरसनने ‘घरच्या’ मैैदानावर लंका गोलंदाजी फोडण्यास सुरुवात केली. मुन्रोने ३४ चेंडूत एकही चौकार न मारता ७ उत्तुंग षटकार खेचत ६७ धावांचा तडाखा दिला़, तर अँडरसनने केवळ २९ चेंडूत ४ चौकार व ५ षटकारांची आतषबाजी करून ६० धावा कुटल्या. श्रीलंकेकडून शनाकाने २ बळी घेतले, तर सुरंगा लकमल एक बळी घेण्यात यशस्वी ठरला. कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने एकूण सहा गोलंदाज वापरले; मात्र त्यांची गोलंदाजी किवी हल्ल्यापुढे सपशेल अपयशी ठरली. (क्रीडा प्रतिनिधी)संक्षिप्त धावफलक :न्यूझीलंड : २० षटकांत ५ बाद २२६ धावा (कॉलिन मुन्रो ६७, कोरी अँडरसन ६०, मार्टिन गुप्टील ४१; दासुन शनाका २/३७) वि.वि. श्रीलंका : २० षटकांत ७ बाद १५२ धावा (लाहिरु थिरीमाने ४१, चमारा कापुगेदरा ३८; अ‍ॅडम मिल्ने ३/२६, ईश सोधी २/१९).