रेल्वेची मजबूत पकड

By Admin | Updated: November 18, 2015 02:11 IST2015-11-18T02:11:13+5:302015-11-18T02:11:13+5:30

सौरभ वाकसकर (नाबाद १६१) याने झळकावलेले शानदार दीडशतक आणि व्ही. चेलुवराज (नाबाद ७०) याची अर्धशतकी खेळी या जोरावर रेल्वे संघाने रणजी ट्रॉफी सामन्यात बलाढ्य मुंबईविरुद्ध

Strong grip of the train | रेल्वेची मजबूत पकड

रेल्वेची मजबूत पकड

मुंबई : सौरभ वाकसकर (नाबाद १६१) याने झळकावलेले शानदार दीडशतक आणि व्ही. चेलुवराज (नाबाद ७०) याची अर्धशतकी खेळी या जोरावर रेल्वे संघाने रणजी ट्रॉफी सामन्यात बलाढ्य मुंबईविरुद्ध तिसऱ्या दिवसअखेर मजबूत पकड घेतली. रेल्वेने आपल्या दुसऱ्या डावात मजबूत खेळी करताना केवळ एका फलंदाजाच्या मोबदल्यात २८५ धावांची मजल मारत मुंबईविरुद्ध १७१ धावांची दमदार आघाडी घेतली आहे.
वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या ‘ब’ गटातील या सामन्यात यजमानांनी तिसऱ्या दिवशी ९ बाद ३३० धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. या वेळी सर्वांना उत्सुकता होती ती निखिल पाटीलच्या शतकाची. मात्र विशाल दाभोळकर पहिल्याच षटकात बाद झाल्याने निखिल ८३ धावांवर नाबाद राहिला. मुंबईने केवळ एका धावाची भर टाकून ३३१ धावांची मजल मारत रेल्वेविरुद्ध पहिल्या डावात ११४ धावांची आघाडी घेतली. कर्ण शर्माने दाभोळकरला बाद करून पहिल्या डावात ७ बळी घेण्याचा पराक्रम केला. यानंतर शतकी अघाडीचे ओझे घेऊन फलंदाजीला उतरलेल्या रेल्वेच्या वाकसकर - आशिष सिंग या सलामीवीरांनी सावध सुरुवात केली. मुंबईकर गोलंदाजीचा धैर्याने सामना करताना त्यांनी संघाला शतकी सलामी दिली. फिरकी गोलंदाज दाभोळकरने आशिषला पायचीत पकडून रेल्वेला १०५ धावांवर पहिला धक्का दिला.
या वेळी मुंबई पकड मिळवणार अशी शक्यता होती. मात्र चेलुवराजने वाकसकरच्या साथीने दिवसअखेर टिकून राहत मुंबईकरांना दमवले. (क्रीडा प्रतिनिधी)
वाकसकर - चेलुवराज यांनी दुसऱ्या विकेटसाठी नाबाद १८० धावांची भागीदारी केली. वाकसकरने २६० चेंडंूत १५ चौकार व २ षटकारांसह नाबाद १६१ धावांची शानदार खेळी केली असून, चेलुवराजने त्याला मोलाची साथ देताना १६७ धावांत ६ चौकारांसह ७० धावांची संयमी अर्धशतकी खेळी खेळली. सामन्याच्या अखेरच्या दिवशी रेल्वेचे झटपट बळी घेत सामन्यात पुनरागमनाचे यजमानांचे प्रयत्न असतील. मात्र एकूण चित्र पाहता सामना अनिर्णीत राहण्याची चिन्हे दिसत आहेत.

धावफलक :
रेल्वे (पहिला डाव) : ८४.४ षटकांत सर्वबाद २१७ धावा.
मुंबई (पहिला डाव) : अखिल हेरवाडकर झे. नंदी गो. शर्मा १४५, जय बिस्त झे. मिश्रा गो. अनुरीत सिंग २, धवल कुलकर्णी त्रि. गो. शर्मा ०, श्रेयश अय्यर झे. रावत गो. शर्मा ५७, सूर्यकुमार यादव झे. मिश्रा गो. नंदी ७, आदित्य तरे झे. घोष गो. शर्मा ०, सिद्धेश लाड पायचीत गो. शर्मा ५, निखिल पाटील नाबाद ८३, शार्दुल ठाकूर झे. चेलुवराज गो. शर्मा ९, हरमीत सिंग धावबाद (फैझ अहमद) २०, विशाल दाभोळकर पायचीत गो. दाभोळकर ०.
अवांतर - ३. एकूण : ९५.४ षटकांत सर्वबाद ३३१ धावा.
गोलंदाजी : अनुरीत सिंग २७-६-९५-१; कर्ण शर्मा ३१.४-३-९१-७; अर्णब नंदी २१-१-७६-१; अक्षत पांड्ये १३-१-५३-०; एस.एस. मिश्रा ३-०-१४-०.

रेल्वे (दुसरा डाव) : सौरभ वाकसकर खेळत आहे १६१, आशिष सिंग पायचीत गो. दाभोळकर ४४, व्ही. चेलुवराज खेळत आहे ७०. अवांतर - १०. एकूण : ८६ षटकांत १ बाद २८५ धावा.
गोलंदाजी : धवल कुलकर्णी १७-६-३८-०; शार्दुल ठाकूर १५-५-३७-०; विशाल दाभोळकर १९-१-८१-१; जय बिस्त १५-२-४९-०; हरमीत सिंग १२-०-४०-०; सिद्धेश लाड ४-०-२०-०; श्रेयश अय्यर ४-१-११-०.

Web Title: Strong grip of the train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.