स्ट्राईक रोटेट करणे भागीदारीतील महत्त्वाचे वैशिष्ट्य : मॅकमिलन
By Admin | Updated: September 24, 2016 05:18 IST2016-09-24T05:18:04+5:302016-09-24T05:18:04+5:30
विलियम्सन व लॅथम यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या ११७ धावांच्या अभेद्य भागीदारीदरम्यान स्ट्राईक रोटेट करणे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले

स्ट्राईक रोटेट करणे भागीदारीतील महत्त्वाचे वैशिष्ट्य : मॅकमिलन
कानपूर : विलियम्सन व लॅथम यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या ११७ धावांच्या अभेद्य भागीदारीदरम्यान स्ट्राईक रोटेट करणे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले, अशी प्रतिक्रिया न्यूझीलंडचे फलंदाजी प्रशिक्षक क्रेग मॅकमिलन यांनी व्यक्त केली. भारताला सकाळच्या सत्रात केवळ एक बळी घेता आला तर दुसऱ्या सत्रात २६ षटकांमध्ये एकही विकेट मिळवता आली नाही.
खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मॅकमिलन म्हणाले,‘लॅथमची शिस्त महत्त्वाची ठरली. त्याने योजनाबद्ध खेळ केला. एक डावखुरा व एक उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या या जोडीची स्ट्राईक रोटेट करण्याची रणनीती महत्त्वाची ठरली. खेळपट्टी अद्याप चांगली आहे. काही चेंडू वळत आहेत. लॅथम व विलियम्सन यांनी आज शिस्तबद्ध फलंदाजी केली. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी फिरकीचे आव्हान पेलण्यासाठी कसून मेहनत घेतली आहे. फिरकीला सर्वोत्तम खेळणाऱ्या जगातील फलंदाजांचे फूटवर्क चांगले असते. प्रत्येकाचे तंत्र वेगळे असते. आज दोन्ही फलंदाजांनी क्रिझचा चांगला वापर केला.’ (वृत्तसंस्था)