खेळपट्टीवर भडकले दिग्गज !
By Admin | Updated: November 27, 2015 00:43 IST2015-11-27T00:43:10+5:302015-11-27T00:43:10+5:30
भारत-द. आफ्रिकेदरम्यान जामठा येथे होत असलेल्या तिसऱ्या कसोटीसाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीवरून खडाजंगी होत आहे. अनेक दिग्गजांनी या खेळपट्टीवर कठोर शब्दांत टीका केली.

खेळपट्टीवर भडकले दिग्गज !
नागपूर : भारत-द. आफ्रिकेदरम्यान जामठा येथे होत असलेल्या तिसऱ्या कसोटीसाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीवरून खडाजंगी होत आहे. अनेक दिग्गजांनी या खेळपट्टीवर कठोर शब्दांत टीका केली. या खेळपट्टीवर पहिल्या दिवशी १२ आणि दुसऱ्या दिवशी २० असे दोन दिवसांत ३२ गडी बाद झाले. भारताने दुसऱ्या दिवशी दुसऱ्या डावांत सर्व दहा गडी गमावले. मोहालीतील पहिल्या कसोटीतही असेच काहीसे घडले. सामन्याचा निकाल तीन दिवसांत लागला.
ही खराब खेळपट्टी असून, पहिल्या तासापासूनच फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरली. - ग्लेन मॅक्सवेल
कुठल्याही गोलंदाजाला विचारल्यास तो अशा खेळपट्टीवर गोलंदाजी करणे पसंत करणार नाही.
- जॅक्स कालिस ही खेळपट्टी कसोटीसाठी अतिशय खराब आहे.
- मायकेल वॉनकसोटीमध्ये तिन्ही क्षेत्रात कस लागतो, पण या कसोटीत खेळपट्टी केवळ फिरकीला अनुकूल ठरली. हे कसोटी क्रिकेट नव्हे. - रॉबिन पीटरसन
आयासीसीने पुढाकार घेत कसोटी क्रिकेटसाठी खेळपट्टी तयार करण्याचे
काम सुरू करायला हवे. आम्हाला चेंडू
बॅटवर येणारी खेळपट्टी हवी, आखाडा ठरणारी नव्हे. - वसीम अक्रम
कसोटी क्रिकेटचा स्तर किती घसरला हे पाहणे निराशाजनक ठरते.
- मॅथ्यू हेडन
द. आफ्रिकेला फिरकीला तोंड देणे अवघड होत असेल तर मुळात ही खेळपट्टी खराब आहे.
- राजदीप सरदेसाई