धर्माच्या नावाखालील दहशतवादाचा खेळ थांबवा - ट्रम्प
By Admin | Updated: May 21, 2017 23:05 IST2017-05-21T23:05:44+5:302017-05-21T23:05:44+5:30
धर्माच्या नावाखाली चालणारा दहशतवादाचा खेळ थांबला पाहिजे, असे मत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आज व्यक्त केले

धर्माच्या नावाखालील दहशतवादाचा खेळ थांबवा - ट्रम्प
>ऑनलाइन लोकमत
रियाध, दि. 21 - धर्माच्या नावाखाली चालणारा दहशतवादाचा खेळ थांबला पाहिजे, असे मत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आज व्यक्त केले. ट्रम्प यांनी आज 40 हून अधिक इस्लामिक देशांच्या नेत्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी दहशतवाद संपुष्टात आणण्याचे आवाहन या देशांना केले. या देशांनी आपल्या पवित्र भूमीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी करू देऊ नये, असे ट्रम्प म्हणाले.
या परिषदेला संबोधित करताना ट्रम्प म्हणाले. "दहशतवादामुळे जगभरातील देश त्रस्त आहेत. तर काही देश दहशतवादाला खतपाणी घातल आहेत. त्यामुळे मध्य-पूर्वेपासून ते भारत आणि रशियासारख्या देशांनाही फटका बसत आहे. त्यामुळे धर्माच्या नावाखाली चालणारा दहशतवादाचा खेळ थांबवला पाहिजे." यावेळी ट्रम्प यांनी इराणवरही टीका केली. इराण सामुदायिक हिंसेला प्रोत्साहन देत असल्याचे ते म्हणाले. ट्रम्प यांच्या संबोधनावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ हेही उपस्थित होते.