क्षेत्ररक्षणातील अडथळ्यामुळे बाद होणारा स्टोक्स सहावा खेळाडू
By Admin | Updated: September 7, 2015 00:08 IST2015-09-07T00:08:19+5:302015-09-07T00:08:19+5:30
अष्टपैलू बेन स्टोक्स एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्यामुळे (आॅबस्ट्रक्ंिटग द फिल्ड) बाद ठरवला गेलेला जगातील सहावा आणि इंग्लंडचा पहिलाच फलंदाज ठरला.

क्षेत्ररक्षणातील अडथळ्यामुळे बाद होणारा स्टोक्स सहावा खेळाडू
लंडन : अष्टपैलू बेन स्टोक्स एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्यामुळे (आॅबस्ट्रक्ंिटग द फिल्ड) बाद ठरवला गेलेला जगातील सहावा आणि इंग्लंडचा पहिलाच फलंदाज ठरला.
ही घटना इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया यांच्यात शनिवारी लॉर्डस् येथे झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान झाली. आॅस्ट्रेलियाने हा सामना ६४ धावांनी जिंकला; परंतु स्टोक्सला ‘आॅबस्ट्रक्टिंग द फिल्ड’ बाद दिले गेल्यामुळे वाद निर्माण झाला.
लॉर्डस्मध्ये झालेल्या सामन्यात ही घटना डावाच्या २६ व्या षटकात घडली. जेव्हा स्टोक्सने मारलेला स्ट्रेट ड्राईव्ह वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने रोखला. डावखुरा वेगवान गोलंदाज स्टार्कने त्यानंतर चेंडू स्टोक्सकडे फेकला. तो चेंडू स्टोक्सने हाताने रोखला. स्टोक्सने धावबाद होण्याची शक्यता समाप्त केल्याचे अपील आॅस्ट्रेलियाने केले. त्यावर मैदानी पंच कुमार धर्मसेना आणि टीम रॉबिन्सन यांनी थर्ड अम्पायर जोएल विल्सन यांच्याकडे याविषयी सल्ला मागितला. थर्ड अम्पायरने अनेकदा रिप्ले पाहून स्टोक्स बाद असल्याचा निर्णय दिला. त्या वेळेस स्टोक्स दहा धावांवर होता. सामन्यानंतर आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने थर्ड अम्पायरचे आणि त्यांच्या पंचांच्या निर्णयाचे समर्थन केले; परंतु स्टोक्सने हे जाणीवपूर्वक केले नसून त्याने स्वत:ला वाचविण्यासाठी असे केले, असे इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गन याने सांगितले. या घटनेनंतर प्रेक्षकांनी आॅस्ट्रेलियन खेळाडू आणि विशेषत: स्टार्कच्याविरुद्ध घोषणा दिल्या.
विशेष म्हणजे आशिया खंडाबाहेरील अशा पद्धतीने बाद दिला गेलेला बेन स्टोक्स हा पहिलाच फलंदाज ठरला. याआधी पाकिस्तानच्या चार आणि
भारताच्या एका फलंदाजाला अशा प्रकारे बाद ठरविण्यात आले
होते. क्षेत्ररक्षणात अडथळा आणणाऱ्या फलंदाजाला अशा प्रकारे बाद ठरवले जाते.
पाकिस्तानचा रमीझ राजा अशा पद्धतीने बाद होणारा पहिला फलंदाज होता. १९८७ मध्ये भारताविरुद्ध कराचीत ९९ धावांवर असताना क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्यामुळे पंचांनी त्याला बाद ठरवले होते. १९८९ मध्ये मोहिंदर अमरनाथला श्रीलंकेविरुद्ध अहमदाबाद येथे झालेल्या सामन्यात ‘आॅबस्ट्रक्टिंग द फिल्ड’ बाद दिले गेले. पाकिस्तानचे अन्य तीन फलंदाज इंजमाम-उल-हक (विरुद्ध भारत, पेशावर २००८), मोहम्मद हाफीज (वि. दक्षिण आफ्रिका, दर्बन २०१३) आणि अन्वर अली (वि. दक्षिण आफ्रिका, पोर्ट आॅफ एलिझाबेथ) हेदेखील अशाच प्रकारे बाद झालेले आहेत.
(वृत्तसंस्था)