राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत धरणगावच्या रूपालीला सुवर्ण पदक 11
By Admin | Updated: November 28, 2015 00:00 IST2015-11-28T00:00:26+5:302015-11-28T00:00:26+5:30
जळगाव : येथील इंदिरा गांधी विद्यालयाची विद्यार्थिनी रूपाली रमेश महाजन हिने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे. हिंगोली येथे झालेल्या स्पर्धेत रूपालीने ४८ किलो गटात विजय मिळवला.

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत धरणगावच्या रूपालीला सुवर्ण पदक 11
ज गाव : येथील इंदिरा गांधी विद्यालयाची विद्यार्थिनी रूपाली रमेश महाजन हिने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे. हिंगोली येथे झालेल्या स्पर्धेत रूपालीने ४८ किलो गटात विजय मिळवला. राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ४८ किलो गटात रूपालीने सलग चार फेर्यांमध्ये विजय मिळवला व अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीतही तीने प्रतिस्पर्धी पुणे विभागाची खेळाडू कोमल जाधव हिला अस्मान दाखवले व सुवर्णपदकाची कमाई केली. रूपाली हिने नाशिक विभागातही सुवर्ण पदक पटकावले होते. या कामगिरीच्या आधारावरच तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डी.जी.पाटील, सचिव सी.के.पाटील, मोहन जैन, अनुराग वाजपेयी, प्राचार्या सुरेखा पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, कुस्ती प्रशिक्षक जगदीश चौधरी, जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी आमदार राजीव देशमुख, शिवाजी राजपूत, सुनील देशमुख, मल्ल भानुदास विसावे यांनी अभिनंदन केले आहे. रूपालीला क्रीडा शिक्षक डी.एन. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सोबत फोटो १ कॉलम