राज्य सायकल पोलो सामने

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:03+5:302015-02-18T00:13:03+5:30

नागपूर संघाची विजयी सलामी

State Cycle Polo Front | राज्य सायकल पोलो सामने

राज्य सायकल पोलो सामने

गपूर संघाची विजयी सलामी
राज्य अजिंक्यपद सायकल पोलो स्पर्धा
नागपूर : ज्युनियर मुलांच्या गटात नागपूर जिल्हा संघाने तिन्ही साखळी सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करीत राज्य सायकल पोलो स्पर्धेत विजयी मोहीम कायम ठेवली आहे.
ज्युनियर मुले-मुली आणि सब ज्युनियर मुलांची राज्यस्तर सायकल पोलो स्पर्धा अजनी रेल्वे परिसरातील उर्दू शाळेच्या मैदानावर प्रारंभ झाली.
स्पर्धेचे उद्घाटन आ़डॉ. मिलिंद माने यांच्या हस्ते झाले़ समारंभाला माजी आ़ दीनानाथ पडोळे, भारतीय सायकल पोलो महासंघाचे उपाध्यक्ष पी.एस. ठाकरे, कार्याध्यक्ष डॉ. विनोद जैस्वाल, सहसचिव डॉ. एन.टी. देशमुख उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा संघटनेचे सचिव गजानन बुरडे यांनी केले. संचालन एन.बी. पाल यांनी केले आणि उत्तम इटनकर यांनी आभार मानले.
ज्युनियर मुलांच्या गटातील पहिल्या सामन्यात नागपूरने गोंदिया जिल्ह्याला ११-३ अशा गोलफरकाने नमवीत विजयी सलामी दिली. नागपूरच्या मोहित खोब्रागडे, जय उकेने प्रत्येकी ३, लेशांत डाहाके, हिमांशू शिंदेने प्रत्येकी २ गोल केले. गोंदियाच्या वृषभने ३ गोल केले. दुसऱ्या लढतीत नागपूरने बुलडाणा संघाला ८-१ ने पराभूत केले. लेशांत डाहाकेने ४, जय उकेने ३ गोल केले. सब ज्युनियर मुलांच्या गटातील पहिल्या लढतीत नागपूरने गोंदियाला ३-० ने पराभूत केले. नागपूरच्या सौरभ भर्रे, प्रणय वरखेडे, कौशिक साखरेने प्रत्येकी १ गोल नोंदविला. दुसऱ्या सामन्यात लातूरने नागपूरला ५-० ने पराभवाचा धक्का दिला. लातूरच्या आदित्य रोकडेने ४, अविनाश धर्माधिकारीने १ गोल केला. अन्य सामन्यात गोंदियाने नाशिकला ३-० ने पराभूत केले.

Web Title: State Cycle Polo Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.