राज्य बुद्धिबळ सामने
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:25+5:302015-01-23T23:06:25+5:30
१९ वर्षे गटाची राज्य बुद्धिबळ स्पर्धा

राज्य बुद्धिबळ सामने
१ वर्षे गटाची राज्य बुद्धिबळ स्पर्धाचौथ्या फेरीअखेर सोनलला एकमेव आघाडीनागपूर : स्थानिक खेळाडू सोनल मानधना हिने दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज सभागृहात सुरु असलेल्या १९ वर्षे गटाच्या राज्य खुला गट तसेच मुलींच्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत चौथ्या फेरीअखेर चार गुणांची कमाई करीत एकमेव आघाडी संपादन केली. शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या चौथ्या फेरीत सोनलने तनया पांडेला नमविले. अव्वल पटावर सृष्टी पांडे हिला साक्षी चैतलांगे हिने रोखले. सृष्टी आणि साक्षी यांचे प्रत्येकी साडेतीन गुण झाल्याने दोघी दुसऱ्या स्थानावर आहेत. श्वेता गोळे हिने आपलीच धाकटी बहीण वैष्णवी गोळेवर मात करीत तिसरा गुण पटकावला. मुलांमध्ये अथर्व गोडबोले, इंद्रजित महिंद्रकर, आर. साई श्रवण आणि सर्वेश राव हे सर्वजण प्रत्येकी चार गुणांसह संयुक्तरित्या अव्वल स्थानावर आहेत.(क्रीडा प्रतिनिधी)चौथ्या फेरीचे निकाल :- मुली सृष्टी पांडे ३.५ बरोबरी साक्षी चैतलांगे ३.५, तनया पांडे २.५ पराभूत सोनल मानधना ४, श्वेता गोळे ३ मात वैष्णवी गोळे २, सलोनी सपाळे २.५ बरोबरीत शलाका पागे २.५, दिव्या देशमुख ३ मात अनुष्षा कोहळे २, नारायणी अदाने ३ मात ईशा सारडा २, ज्ञानदा २.५ मात खुशी गोसावी २, शुभस्मिता साहू २.५ मात सिया ठाकरे १.५, अनन्या गुप्ता १.५ बरोबरी गुरलिन चावला १.५.मुले:रौनक साधवानी ३ पराभूत अथर्व गोडबोले ४, प्रृथू देशपांडे ३.५ बरोबरी संकर्ष शेळके ३.५, इंद्रजित महिंद्रकर ४ मात वैभव राऊत ३, साई श्रवण ४ मात आशुतोष दलाल ३, प्रियांशु पाटील ३ पराभूत सर्वेश राव ४, अनिश गांधी ३.५ मात पुष्कर डोंगरे २.५, रिनेश मेश्राम २.५ पराभूत प्रसाद औरंगाबादकर ३.५, निशितसिंग ३.५ मात देवांश रत्ती २.५, रोनित दास २.५ मात रितिक गढिया ३.५, सुयोग वाघ ३ मात तनिश लाड २.५.