शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

प्रौढांची राज्य टेबल टेनिस : पीवायसीचे दोन संघ उपांत्य फेरीत; सोलापूर ‘अ’, सांताक्रूझ जिमखानादेखील अंतिम चारमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 4:56 AM

डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती चषक प्रौढ गट राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखान्याच्या ‘अ’ आणि ‘ब’ संघांनी सांघिक गटातून शनिवारी उपांत्य फेरी गाठली.

पुणे : डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती चषक प्रौढ गट राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखान्याच्या ‘अ’ आणि ‘ब’ संघांनी सांघिक गटातून शनिवारी उपांत्य फेरी गाठली.पीवायसी हिंदू जिमखानातर्फे आणि पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने आयोजित ही स्पर्धा पीवायसी हिंदू जिमखान्याच्या टेबल टेनिस सेंटरमध्ये सुरू आहे. उपांत्यपूर्व फेरीत पीवायसी ‘अ’ने गोमांंतक ‘अ’चे अव्हान ३-०ने संपवले. उपेंद्र मुळ्ये आणि रोहित चौधरी यांनी एकेरी तसेच दुहेरी प्रकारात आपापल्या लढती जिंकून गोमांतक संघावर निर्विवाद वर्चस्व गाजविले. विवेक आळवणी आणि सुनील बाबरस यांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर पीवायसीच्या ‘ब’ संघाने सेंच्युरी वॉरियर्स ‘अ’चा ३-०ने धुव्वा उडवून उपांत्य फेरीत धडक दिली. सोलापूर ‘अ’ विरू द्ध पीवायसी ‘क’ संघ ०-३ने सहजपणे पराभूत झाला. नितीन तोष्णीवाल आणि मनीष आर. सोलापूरच्या विजयाचे शिल्पकार ठरले. सांताक्रूझ जिमखान्याने पीजे हिंदू जिमखान्यावर ३-१ने सरशी साधली.पुणे जिल्हा टेबल टनिस संघटनेच्या उपाध्यक्षा स्मिता बोडस आणि डॉ. विद्या मुळ्ये यांनी टेबल टेनिस खेळून स्पर्धेचे उद्घाटन केले. या वेळी पीवायसी हिंदू जिमखान्याचे खजिनदार आनंद परांजपे, गौरी आपटे, सुभाष लोढा, दीपक हळदणकर, अविनाश जोशी, कपिल खरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.सांघिक निकाल :उपांत्यपूर्व फेरीपीवायसी हिंदू जिमखाना ‘अ’ विवि गोमंतक ‘अ’ : ३-० (उपेंद्र मुळ्ये विवि अजय कोठावळे ११-९, ११-७, ११-६. रोहित चौधरी विवि समीर भाटे ११-७, ११-८, ११-५. उपेंद्र मुळ्ये- रोहित चौधरी विवि समीर भाटे-श्रीराम ११-८, ११-४, ११-६).सोलापूर ‘अ’ विवि पीवायसी हिंदू जिमखाना ‘क’ :३-० (नितीन तोष्णीवाल विवि सचिन धारवातकर १-११, ११-८, ११-५, ११-७. मनीष आर. विवि दीपेश अभ्यंकर ११-६, ११-१३, ११-६, १४-१२. मनीष आर.-नितीन तोष्णीवाल विवि सचिन धारवातकर-दीपेश अभ्यंकर ११-९, ११-८, ८-११, ११-८.पीवायसी हिंदू जिमखाना ‘ब’ विवि सेंच्युरी वॉरियर्स ‘अ’ ३-० (विवेक आळवणी विवि नितीन मेहेंदळे १३-११, ११-४, ११-७. सुनील बाबरस विवि केदार मोघे ११-७, ११-६, ११-८. विवेक आळवणी-सुनील बाबरस विवि नितीन मेहेंदळे-केदार मोघे ११-४, ११-५, ११-८).सांताक्रूझ जिमखाना विवि पीजे हिंदू जिमखाना : ३-१ (राजेश सिंग विवि प्रकाश केळकर ११-७, १२-१०, ११-४. किरण सालियन विवि अभय मेहता ११-७, ११-९, ११-७. राजेश सिंग -किरण सालियन पराभूत वि. संजय मेहता-अभय मेहता ११-१३, १२-१४, १२-१४. किरण सालियन विवि प्रकाश केळकर ११-५, ११-९, ११-२).

टॅग्स :Sportsक्रीडा