व्हाीएचए शालेय हॉकी सुरू
By Admin | Updated: December 18, 2014 00:40 IST2014-12-18T00:40:40+5:302014-12-18T00:40:40+5:30
व्हीएचएची शालेय हॉकी स्पर्धा सुरू

व्हाीएचए शालेय हॉकी सुरू
व हीएचएची शालेय हॉकी स्पर्धा सुरूस्वामीनारायण स्कूलचा रेल्वे जनमंडलवर एकतर्फी विजय नागपूर : हर्ष पटेल आणि प्रणय कुथे यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी दोन गोलमुळे स्वामीनारायण स्कूलने बुधवारपासून विदर्भ हॉकी संघटनेच्या मैदानावर सुरू झालेल्या आंतर शालेय हॉकी स्पर्धेच्या सलामी लढतीत रेल्वे जनमंडल स्कूलचा ६-१ ने सहज पराभव केला.सामन्यात खाते उघडले ते रेल्वे जनमंडलने. या संघाकडून सातव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर रौनक चौधरी याने गोल नोंदवित आघाडी मिळवून दिली होती. पण हर्ष पटेल याने स्वामीनारायणसाठी झटपट दोन गोल नोंदविले. नवव्या मिनिटाला त्याने पहिला आणि ११ व्या मिनिटाला दुसरा गोल केला. विशाल सगनानी आणि सत्यम सहोडिया यांनी अनुक्रमे १५ आणि २१ व्या मिनिटांना गोल नोंदवित आघाडी ४-१ अशी केली. प्रणय कुथे याने २५ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करीत पाचवा तसेच ३९ व्या मिनिटाला पुन्हा एकदा धडक देत स्वत:चा दुसरा आणि संंघाचा सहावा गोल नोंदविला. त्याआधी माजी गोलकिपर सुभाष चंदर यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी व्हीएचए अध्यक्ष राधेशाम सारडा हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी सचिव विनोद त्रिवेदी, कोषाध्यक्ष श्याम शर्मा, सहसचिव प्रमोदजैन,सलिम बेग, नंदू आकोजवार, कुणाल पाटील, गुरुमूर्ती पिल्ले, संजय लोखंडे, रामपाल ठाकूर, सुनील मदने, रवी सिरपतवार, शीतलसिंग, जागेश्वर कैथवास, अशोक सक्करगाये, जावेद राणा, आदींची उपस्थित होती. धर्मेंद्र कनोजिया यांनी संचालन केले. पाकमध्ये झालेल्या दहशतवादी कृत्यात मृत्युमुखी पडलेल्या बालकांना यावेळी खेळाडू आणि पदाधिकाऱ्यांनी मौन श्रद्धांजली अर्पण केली. सुभाष चंदर यांनी यावेळी स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूला ११०० रुपयांचा रोख पुरस्कार देण्याची घोषणा केली. उद्या गुरुवारी सेंट जॉन्स हायस्कूलविरुद्ध आरबीजीजी हा सामना सकाळी ९ वाजेपासून, एसएफएसविरुद्ध जाईबाई चौधरी हायस्कूल हा सामना १० पासून जिंगलबेल्सविरुद्ध रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल हा सामना ११ वाजेपासून खेळविण्यात येईल.(क्रीडा प्रतिनिधी)