शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

विनेश फोगाटचं रक्षाबंधन! लाडक्या भावानं दिलं 'भारी' गिफ्ट; मात्र कुस्तीपटूनं घेतली फिरकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 16:10 IST

raksha bandhan 2024 : सर्वत्र रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

Vinesh Phogat Tied Rakhi to her Brother : आज सर्वत्र रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये सुवर्ण कामगिरीला मुकलेल्या विनेश फोगाटनेही आपल्या भावाला राखी बांधली. यावेळी तिच्या भावाने दिलेले गिफ्ट पाहून स्टार कुस्तीपटूने मिश्किल टिप्पणी करताना भावाची फिरकी घेतली. भारताची गोल्डन गर्ल म्हणून तमाम भारतीयांच्या मनात जागा मिळवणारी विनेश फोगाट शनिवारी मायदेशात परतली. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये अंतिम फेरी गाठूनही विनेश पदकाला मुकली. १०० ग्रॅम वजन वाढल्याने भारताच्या हक्काचे पदक गेले. अखेर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले पण तिथेही विनेशच्या हाती निराशा पडली. 

विनेश फोगाटने सोमवारी रक्षाबंधनाचा सण साजरा केला. विनेशने भाऊ हरविंदर फोगाटला राखी बांधली. यावेळी तिच्या भावाने तिला एक खास भेट दिली, ज्यामुळे सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. आपल्या भावाने दिलेली भेट पाहून विनेशनेही स्मित केले. विनेश आणि तिच्या भावाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये विनेश फोगाटने भेटवस्तूबद्दल एक मजेदार टिप्पणी केली. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, विनेश ५०० रुपयांच्या नोटांच्या बंडलसोबत दिसत आहे. यावर विनेश हसत म्हणते की, मी आता ३० वर्षांची आहे. मागच्या वर्षी देखील माझ्या भावाने मला ५०० रुपये दिले आणि यावेळीही तेवढीच रक्कम आहे. ही माझ्या भावाची संपूर्ण आयुष्याची कमाई आहे, असे विनेशने मिश्किलपणे म्हटले.  

दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने पाच कांस्य आणि एक रौप्य अशी एकूण सहा पदके जिंकली. मागील ऑलिम्पिकपेक्षा यंदा भारताला एक पदक कमी मिळाले. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने पदकाचे खाते उघडले. तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले. मग भारताच्या हॉकी संघाने कांस्य पदक जिंकले, तर भालाफेकमध्ये मागील ऑलिम्पिकमधील चॅम्पियन नीरज चोप्राने रौप्य पदकाला गवसणी घातली. याशिवाय अमन सेहरावतने कुस्तीत कांस्य पदकाची कमाई केली. 

टॅग्स :Vinesh Phogatविनेश फोगटRaksha Bandhanरक्षाबंधनWrestlingकुस्ती