स्टार क्रिकेटपटूंची गोव्यात आजपासून लढत
By Admin | Updated: February 29, 2016 00:07 IST2016-02-29T00:07:33+5:302016-02-29T00:07:33+5:30
टी-२० स्पर्धा: एमसीसी, आर्लेम, चिखली व जीसीए मैदानावर सामने

स्टार क्रिकेटपटूंची गोव्यात आजपासून लढत
ट -२० स्पर्धा: एमसीसी, आर्लेम, चिखली व जीसीए मैदानावर सामनेपणजी : ऑईस अँड नॅचरल गॅस कापोर्रेशन (ओएनजीसी) ने आयोजित केलेली पेट्रोलियम स्पोट्र्स प्रोमोशन बोर्ड (पीएसपीबी) चे अंतर्गत युनिट आणि ऑल इंडिया पब्लिक सेक्टर स्पोट्र्स प्रोमोशन बोर्ड (एआयपीएसएसपीबी) ची टी-२० क्रिकेट स्पर्धा आज (दि. २९) पासून गोव्यात विविध ठिकाणी सुरू होत आहे. प्रथमच ही स्पर्धा गोव्यात होत असून, ती दि. ११ मार्चपयंर्त चालणार आहे. या स्पर्धेत देशभरातील आघाडीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू खेळणार असल्याची माहिती ओएनजीसीचे गौतम वढेरा यांनी पत्रकार परिषदेत रविवारी दिली. या परिषदेस गोवा क्रिकेट संघटनेचे विनोद फडके, समीर काणेकर, ओएनजीसी संघाचा प्रशिक्षक साईराज बहुतुले, भारतीय पेट्रोलियम संघाचा प्रशिक्षक मंदार फडके आणि इतर मान्यवर उपस्थित होते. वढेरा म्हणाले की, या स्पर्धेत रणजी खेळाडूंसह राष्ट्रीय संघातून खेळलेले खेळाडू विविध संघांतून खेळणार आहेत.दररोज चार सामने होतील. दोन्ही गटातील आघाडीचे दोन संघ उपांत्य फेरीत खेळतील आणि अंतिम सामना जीसीएच्या मैदानावर होईल. जीसीएचे मैदान, एमसीसी (मडगाव), आर्लेम या मैदानावर पीएसपीबीचे सामने दि. २९ ते ५ मार्च रोजी होतील, तर एआयपीएसएसपीबीचे सामने दि. ६ ते ११ मार्चपयंर्त जीसीए मैदान, एमसीसी, आर्लेम आणि चिखली मैदानावर सामने होतील. या स्पर्धा आयोजनासाठी जीसीएने संपूर्ण सहकार्य केल्याचे वढेरा यांनी सांगितले. ईशांत, अमित, प्रवीण, प्रज्ञान यांचा सहभागईशांत शर्मा, अमित मिश्रा, प्रवीण कुमार, मुनाफ पटेल, मनीष पांड्ये, वासिम जाफर, अजय रात्रा, संदीप सिंग, अमित भंडारी, चेतेश्वर पुजारा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, श्रेयस गोपा, प्रज्ञान ओझा, आदित्य तरे, बलविंदर संधू, रमेश पोवार, त्याचबरोबर १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत खेळलेले अरमान जाफर, अवेश खान या खेळाडूंचा प्रामुख्याने सहभाग आहे.