शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

स्टार बॉक्सर विजेंदर सिंगचा पुढील प्रतिस्पर्धी निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 2:04 AM

रशियाच्या अर्तयस लोपसनविरूद्ध लढणार

नवी दिल्ली : भारताचा व्यावसायिक बॉक्सर विजेंदर सिंग आपल्या आगामी लढतीसाठी सज्ज होत असून, तो आता रशियाच्या अर्तयश लोपसनविरूद्ध लढेल. कोरोनामुळे एक वर्षाहून अधिक काळ रिंगपासून दूर राहिल्यानंतर १९ मार्चला विजेंदर पुनरागमन करेल. 

गोवा येथे एका कसिनो जहाजाच्या छतावर होणारी ही लढत सुपर मिडल-वेट (७६ किलो) गटात खेळविण्यात येईल. नवी दिल्ली येथे झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान लोपसनच्या नावाची घोषणा करण्यात आली. या लढतीसाठी विजेंदरने चांगलीच तयारी केली असून, राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्य पदक विजेता जय भगवान याच्यासह तो सराव करत आहे. विजेंदरने सांगितले की, ‘मोठ्या कालावधीनंतर रिंगमध्ये उतरणे सोपे नव्हते आणि शारीरिक लय मिळवण्यासाठी थोडा वेळ लागला. मात्र, मागील दोन महिने माझ्यासाठी चांगले ठरले. जय भगवानने गुरुग्राममध्ये सरावादरम्यान माझी खूप मदत केली. यादरम्यान मी माझे ब्रिटिश प्रशिक्षक ली बियर्ड यांच्याशी ऑनलाईनद्वारे संपर्कातही होतो.’

कोण आहे रशियाचा अर्तयश लोपसन?रशियाचा २६ वर्षीय अर्तयश लोपसन याने आतापर्यंत सहा व्यावसायिक लढती खेळल्या असून, यापैकी चार लढती त्याने जिंकल्या आहेत. या चार विजयांपैकी दोन विजय त्याने नॉकआऊटने जिंकल्या. डिसेंबर २०२० मध्ये लोपसनने आपला अखेरचा विजय मिळवला असून, त्यात त्याने युसूफ मागोमेदवेकोवला गुणांच्या अधारे नमवले होते. 

विजेंदरचा तुफान फॉर्म!nव्यावसायिक बॉक्सिंगमध्ये विजेंदर अद्याप अपराजित राहिला आहे. त्याने आतापर्यंत १२ लढती खेळताना सर्व लढती जिंकल्या असून, त्यापैकी ८ लढती नॉकआऊटने जिंकल्या हे विशेष. nबीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावलेल्या विजेंदरने आपल्या याआधीच्या लढतीत राष्ट्रकुल स्पर्धेचा माजी विजेता चार्ल्स एडामू याला दुबईत नमवले.

टॅग्स :Vijender Singhविजेंदर सिंगboxingबॉक्सिंग