सेंट जोसेफच्या सुमेर आवसेकरची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2015 02:55 IST2015-11-07T02:55:02+5:302015-11-07T02:55:02+5:30

सेंट जोसेफच्या सुमेर आवसेकरची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड
>सोलापूर: कोलकाता येथे होणार्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी सेंट जोसेफ हायस्कूलच्या सुमेर आवसेकर याची 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या संघात सेंटर फॉरवर्ड म्हणून निवड झाली आह़ेसुमेर याने कोल्हापुरातील शिवाजी स्टेडियम येथे झालेल्या राज्यस्तरीय निवड चाचणी फुटबॉल स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले होत़े त्यामुळे त्याची राष्ट्रीय संघात निवड झाली आह़े त्याला क्रीडा मार्गदर्शक राजेंद्र गोटे, सहायक प्रशिक्षक शुभम काळे यांचे मार्गदर्शन लाभल़े त्याचे मुख्याध्यापक रेव्हरंड फादर सायमन डिसुझा यांनी कौतुक केले आह़े (क्रीडा प्रतिनिधी)राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झालेल्या सेंट जोसेफ हायस्कूलच्या सुमेर आवसेकरसोबत मुख्याध्यापक फादर सायमन डिसुझा, राजेंद्र गोट़े