श्रीनिवासन करणार टीएनसीएचे प्रतिनिधित्व
By Admin | Updated: June 25, 2017 00:05 IST2017-06-25T00:05:01+5:302017-06-25T00:05:01+5:30
एन. श्रीनिवासन २६ जून रोजी मुंबईत होणाऱ्या बीसीसीआयच्या विशेष आमसभेमध्ये तमिळनाडू क्रिकेट संघटनेचे (टीएनसीए) प्रतिनिधित्व करतील.

श्रीनिवासन करणार टीएनसीएचे प्रतिनिधित्व
चेन्नई : एन. श्रीनिवासन २६ जून रोजी मुंबईत होणाऱ्या बीसीसीआयच्या विशेष आमसभेमध्ये तमिळनाडू क्रिकेट संघटनेचे (टीएनसीए) प्रतिनिधित्व करतील.
एका अधिकाऱ्याने सांगितले, की टीएनसीएने कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये टीएनसीएचे प्रतिनिधित्व करण्यासाठी श्रीनिवासन यांची निवड केली.
सर्वोच्च न्यायालयातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकांच्या समितीसोबत (सीओए) राज्य संघटनांच्या रविवारी होणाऱ्या बैठकीमध्ये श्रीनिवासन सहभागी होतील.
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि आयसीसीचे माजी चेअरमन श्रीनिवासन यांना टीएनसीएचे अध्यक्षपद सोडावे लागले असले तरी पेरम्बलूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे प्रतिनिधी म्हणून संघटनेच्या कार्यकारी समितीचे सदस्य आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या लोढा समितीच्या शिफारशीनंतर त्यांनी टीएनसीएचे अध्यक्ष म्हणून कार्य करणे बंद केले, पण टीएनसीएच्या वेबसाईटवर अद्याप ते संघटनेचे अध्यक्ष असल्याचे दिसून येते. (वृत्तसंस्था)