श्रीनिवासन सलग १४व्यांदा टीएनसीएच्या अध्यक्षपदी
By Admin | Updated: June 13, 2015 00:57 IST2015-06-13T00:57:46+5:302015-06-13T00:57:46+5:30
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि आयसीसीचे चेअरमन एन. श्रीनिवासन हे तामिळनाडू क्रिकेट संघटनेच्या(टीएनसीए)अध्यक्षपदी

श्रीनिवासन सलग १४व्यांदा टीएनसीएच्या अध्यक्षपदी
चेन्नई : बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि आयसीसीचे चेअरमन एन. श्रीनिवासन हे तामिळनाडू क्रिकेट संघटनेच्या(टीएनसीए)अध्यक्षपदी शुक्रवारी सलग १४ व्यांदा निर्वाचित झाले. संघटनेची ८९ वी आमसभा आज पार पडली त्यात श्रीनिवासन यांना एका वर्षासाठी अध्यक्ष निवडण्यात आले.
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात नाव आल्यानंतर श्रीनिवासन यांना बीसीसीआय अध्यक्षपदी कायम राहण्यास सुप्रीम कोर्टाने मनाई केली होती. त्यानंतर त्यांना दुसऱ्यांदा या पदावर येण्याच्या शर्यतीतूनही माघार घ्यावी लागली.
टीएनसीएचे सध्याचे सचिव काशी विश्वनाथन हे आगामी कार्यकायासाठी देखील सचिवपदी कायम राहणार आहेत. व्ही. व्ही. नरसिम्हन यांची कोषाध्यक्षपदी निवड झाली. श्रीनिवासन हे २००२-०३ पासून संघटनेचे अध्यक्ष आहेत. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष ए. सी. मुथय्या यांचा पराभव करीत ते पदावर आले होते.
सर्वोच्य न्यायालयाने संघ मालक आणि बीसीसीआय पदाधिकारी अशा दुटप्पी भूमिकेबद्दल श्रीनिवासन यांना चांगलेच धारेवर धरले होते. यंदा मार्चमध्ये झालेल्या बीसीसीआय अध्यक्षपदाच्या उमेदवारीतून त्यांना प्रतिबंधित करण्यात आले होते. बीसीसीआय अध्यक्ष जगमोहन दालमिया आणि सचिव अनुराग ठाकूर यांच्या नियुक्तीनंतर बोर्डात श्रीनिवासन यांचे महत्त्व फारच घटले आहे. श्रीनिवासन हे २०१६ पर्यंत मात्र आयसीसी चेअरमनपदावर कायम राहणार आहेत. गेल्यावर्षीच त्यांची या पदावर वर्णी लागली होती.(वृत्तसंस्था)