श्रीनिवासन सोडणार सुपरकिंग्जची भागीदारी ?

By Admin | Updated: January 26, 2015 03:02 IST2015-01-26T03:02:00+5:302015-01-26T03:02:00+5:30

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदावरून निलंबनाच्या प्रक्रियेत असलेले एन. श्रीनिवासन हे आयपीएलमधील चेन्नई

Srinikasan's participation in supercencing? | श्रीनिवासन सोडणार सुपरकिंग्जची भागीदारी ?

श्रीनिवासन सोडणार सुपरकिंग्जची भागीदारी ?

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदावरून निलंबनाच्या प्रक्रियेत असलेले एन. श्रीनिवासन हे आयपीएलमधील चेन्नई सुपरकिंग्जची भागीदारी सोडण्याच्या तयारीत आहेत. कारण, ही भागीदारी सोडल्यास ते पुन्हा बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतात.
आयपीएल-सहामधील सट्टेबाजी आणि स्पॉट फिक्सिंग प्रकरणावर सर्वाेच्च न्यायालयाने गेल्या गुरुवारी निकाल जाहीर केला होता. या निकालात त्यांनी श्रीनिवासन यांना ‘क्लीन चिट’ दिली असली, तरी त्यांना निवडणुकीसाठी बीसीसीआय आणि आयपीएल यांच्यापैकी एकाचीच निवड करण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नव्हे, तर आगामी सहा महिन्यांत अध्यक्षपदाच्या निवडणुका घेण्यात याव्या, असेही न्यायालयाने सांगितले आहे.
प्रसारमाध्यमांमधील रिपोर्टनुसार, श्रीनिवासन हे बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी पुन्हा निवडणूक लढण्याच्या विचारात आहेत. यासाठी त्यांना आयपीएलमध्ये कोणतीही भागीदारी ठेवता येणार नाही. श्रीनिवासन यांच्या इंडिया सिमेंट या कंपनीकडेच चेन्नई सुपरकिंग्ज संघाची मालकी आहे. त्यामुळे श्रीनिवासन यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्जची भागीदारी सोडण्याचा विचार केला आहे. असे झाल्यास त्यांची इंडिया सिमेंट ही कंपनी चेन्नई सुपरकिंग्जपासून वेगळी होईल. कारण, न्यायालयाच्या आदेशानुसार कोणताही व्यक्ती जी बीसीसीआयचा सदस्य किंवा आयपीएल फ्रेन्चायझी आहे, ती आयपीएल सामन्यांसाठी गुंतवणूकदार बनू शकत नाही.
दरम्यान, न्यायालयाने श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन तसेच राजस्थान रॉयल्सचे सहमालक राज कुंद्रा यांना सट्टेबाजी प्रकरणात सहभागी असल्याच्या आरोपावरून दोषी ठरविले आहे. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज या दोन्ही संघांवर कारवाई व्हावी, यासाठी सर्वाेच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. ही समिती सहा महिन्यांत आपला अहवाल सादर करेल. (वृत्तसंस्था)

Web Title: Srinikasan's participation in supercencing?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.