श्रीकांतला उपविजेतेपद
By Admin | Updated: December 6, 2015 23:28 IST2015-12-06T23:28:07+5:302015-12-06T23:28:07+5:30
भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत याला इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रविवारी इंडोनेशियन खेळाडू टॉमी सुगियार्तोकडून पराभूत व्हावे

श्रीकांतला उपविजेतेपद
मलांग : भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत याला इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रविवारी इंडोनेशियन खेळाडू टॉमी सुगियार्तोकडून पराभूत व्हावे लागल्याने त्याचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले. ५९ मिनिटे चाललेल्या या संघर्षपूर्ण सामन्यात टॉमीने २१-१७, १३-२१, २२-२४ अशा गेमनी पराभूत करून अजिंक्यपदाचा मुकुट परिधान केला.
पी. व्ही सिंधूसहीत भारताचे अनेक खेळाडू यापूर्वीच पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडल्याने श्रीकांत एकटाच या स्पर्धेत भारताची खिंड लढवीत होता. त्याने झंझावाती प्रदर्शन करीत अंतिम फेरी गाठली; परंतु १२ व्या मानांकित सुगियार्तोचे आव्हान त्याला पार करता आले नाही. सुगियार्तोचा श्रीकांतवर एकूण तिसरा, तर या वर्षातील दुसरा विजय आहे. सुगियार्तोने डेन्मार्क ओपनमध्येही श्रीकांतला हरविले होते. श्रीकांतने फक्त एकदाच २०१४ मध्ये दुबई जागतिक सुपर सीरिजमध्ये सुगियार्तोला पराभूत केले होते.
सामन्यात श्रीकांतने चांगली सुरुवात केली होती. त्याने पहिला सेट २१-१७ असा जिंकला; मात्र घरच्या मैदानाचा फायदा उठवीत सुगियार्तोेने सामन्याला कलाटनी दिली. त्याने नंतरचे दोन सेट जिंकत अजिंक्यपद पटकावले.
इंडोनेशिया मास्टर्सच्या अन्य सामन्यांचा निकालही रविवारी लागला. महिला एकेरीमध्ये बिगिजाओेने चेन युएईला २१-१८, २१-९ असे पराभूत केले. मिश्र दुहेरीत इंडोनेशियाच्या टोंटशेव्ही अहमद व लिलियाना नात्सिर या जोडीने त्यांच्याच देशाच्या पविन जॉर्डन व डेबी सुसांतो या जोडीला २१-१८, २१-१३ असे पराभूत केले. महिला दुहेरीत चीनच्या तांग युआनटिंग व यु यांग या जोडीने इंडोनेशियाच्या नित्या कृष्णंदा माहेश्वरी व ग्रेसिया पोली या जोडीचा २१-१७, २१-११ असा पराभव केला. पुरुष दुहेरीत इंडोनेशियाच्या बेरी एंग्रीयवान व रेयान एगुंग सपुत्रा या जोडीने चीनच्या चाई बाओ व हांग वेई या जोडीचा २१-११, २२-२० असे पराभूत केले.