श्रीलंकेने उडविला पाकचा धुव्वा
By Admin | Updated: July 27, 2015 00:04 IST2015-07-27T00:04:30+5:302015-07-27T00:04:30+5:30
कुशल परेराचे शतक आणि त्यानंतर गोलंदाजांच्या सुरेख कामगिरीच्या बळावर विशाल धावसंख्या उभारणाऱ्या श्रीलंकेने पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय

श्रीलंकेने उडविला पाकचा धुव्वा
हम्बनटोटा : कुशल परेराचे शतक आणि त्यानंतर गोलंदाजांच्या सुरेख कामगिरीच्या बळावर विशाल धावसंख्या उभारणाऱ्या श्रीलंकेने पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तानचा १६५ धावांनी धुव्वा उडवला.
परेराने १०९ चेंडूंत ९ चौकार, ४ षटकारांसह ११६ धावा केल्या. ही त्याच्या कारकीर्दीतील दुसरे शतक आणि सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली. त्याने तिलकरत्ने दिलशान (६२) याच्या साथीने सलामीसाठी १६४ धावांची भागीदारी केली. त्यानंतर कर्णधार अॅन्जोलो मॅथ्यूज (४० चेंडूंत नाबाद ७०) आणि मिलिंदा श्रीवर्धना (२६ चेंडूंत नाबाद ५२) यांनी अखेरच्या ९ षटकांत ११४ धावांची भागीदारी केली. या बळावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने ४ बाद ३६८ असा धावांचा डोंगर रचला. पाकिस्तानचा संघ मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दबावात आला आणि त्यांचा संघ ३७.२ षटकांत २०३ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून मोहम्मद हाफीजने (३७) व कर्णधार अजहर अलीने (३५) सर्वाधिक धावा केल्या.
धावफलक : श्रीलंका ५० षटकांत ४ बाद ३६८. (परेरा ११६, दिलशान ६२, सिरिवर्धना नाबाद ५२, अॅन्जोलो मॅथ्यूज नाबाद ७०, थिरिमाने २९, चांदीमल २९. राहत अली २/७४).
पाकिस्तान : ३७.२ षटकांत सर्वबाद २०३. (मोहम्मद हाफीज ३७, अजहर अली ३५, सर्फराज अहमद २७. सेनानायके ३/३९, परेरा २/३८).(वृत्तसंस्था)