पराभवाचा वचपा काढण्यास श्रीलंका सज्ज

By Admin | Updated: July 14, 2017 01:06 IST2017-07-14T01:06:30+5:302017-07-14T01:06:30+5:30

झिम्बाब्वेविरुद्ध एकमेव कसोटीत विजय मिळवून वन डे मालिकेत झालेल्या अपमानास्पद पराभवाची परतफेड करण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.

Sri Lanka ready to overcome defeat | पराभवाचा वचपा काढण्यास श्रीलंका सज्ज

पराभवाचा वचपा काढण्यास श्रीलंका सज्ज

कोलंबो : नवा कर्णधार दिनेश चांदीमल याच्या नेतृत्वाखालील श्रीलंका संघ आज शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या झिम्बाब्वेविरुद्ध एकमेव कसोटीत विजय मिळवून वन डे मालिकेत झालेल्या अपमानास्पद पराभवाची परतफेड करण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.
पाच सामन्यांची वन डे मालिका झिम्बाब्वेने ३-२ ने जिंकली होती. पराभवाची जबाबदारी स्वीकारुन अँजेलो मॅथ्यूज याने नेतृत्व सोडले. त्याच्याऐवजी दिनेश चंदीमलकडे नेतृत्व सोपविण्यात आले. नव्या जबाबदारीबद्दल चांदीमल उत्सुक आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला तो म्हणाला, ‘मागचे सत्र आमच्यासाठी खडतर ठरले. पण युवा आणि अनुभवी खेळाडूंच्या बळावर झिम्बाब्वेला कसोटी
सामन्यात पराभूत करू असा विश्वास वाटतो.’ लंकेचा संघ कसोटी क्रमवारीत सातव्या स्थानावर आहे. चांदीमलच्या नेतृत्वात संघ नव्याने वाटचाल करण्याची शक्यता आहे.
(वृत्तसंस्था)

Web Title: Sri Lanka ready to overcome defeat