श्रीलंकेची इंग्लंडवर मात
By Admin | Updated: May 22, 2014 05:28 IST2014-05-22T05:28:29+5:302014-05-22T05:28:29+5:30
थिसारा परेराच्या (४९ धावा आणि १ बळी) अष्टपैलू कामगिरीच्या बळावर श्रीलंकेने इंग्लंडविरुद्ध अतिशय रंगतदार ठरलेल्या टी-२० सामन्यात ९ धावांनी शानदार विजय मिळविला़

श्रीलंकेची इंग्लंडवर मात
लंडन : थिसारा परेराच्या (४९ धावा आणि १ बळी) अष्टपैलू कामगिरीच्या बळावर श्रीलंकेने इंग्लंडविरुद्ध अतिशय रंगतदार ठरलेल्या टी-२० सामन्यात ९ धावांनी शानदार विजय मिळविला़ या लढतीत श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १८३ धावा केल्या़ प्रत्युत्तरात इंग्लंड संघ निर्धारित २० षटकांत ७ बाद १७४ धावांपर्यंतच मजल मारू शकला़ इंग्लंडकडून एलेक्स हेल्स याने सर्वाधिक ६६ धावांचे योगदान दिले़ मात्र, त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही़ श्रीलंकेकडून लसिथ मलिंगाने सुरेख गोलंदाजी करताना ३ गडी बाद केले़ त्याआधी लंकेच्या परेरा याने आपल्या खेळीत २० चेंडूंत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने आक्रमक ४९ धावांची खेळी केली़ त्याला साथ देत के़ विठांगे याने ३८ आणि लाहिरू थिरीमाने याने ४० धावांचे योगदान दिले; मात्र त्यांचे सलामीवीर तिलकरत्ने दिलशान (१४) आणि कुशल परेरा (१०) यांना मोठी खेळी करता आली नाही़ फलंदाज इंग्लंडकडून हॅरी गुन्रे याने २ बडी बाद केले़ इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात गुरुवारी ओव्हलवर ५ वन-डे सामन्यांच्या मालिकेतील पहिला वन-डे सामना खेळविण्यात येणार आहे़ त्यानंतर या संघात २ कसोटी सामन्यांची मालिका होईल़ (वृत्तसंस्था)