आशियाई चॅम्पियन्स स्पर्धेसाठी श्रीजेश कर्णधार
By Admin | Updated: October 7, 2016 02:41 IST2016-10-07T02:41:37+5:302016-10-07T02:41:37+5:30
आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघाच्या कर्णधारपदी पी. आर. श्रीजेश, तर उपकर्णधार म्हणून

आशियाई चॅम्पियन्स स्पर्धेसाठी श्रीजेश कर्णधार
बंगळुरू : आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघाच्या कर्णधारपदी पी. आर. श्रीजेश, तर उपकर्णधार म्हणून मनप्रीत सिंह याची निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा मलशियातील कुआंटनमध्ये २० ते ३० आॅक्टोबरदरम्यान होईल.
आशियाई चॅम्पियन्स स्पर्धेसाठी हॉकी इंडियाच्या निवडकर्त्यांनी एस. व्ही. सुनील याच्या जागी मिडफिल्डर मनप्रीत सिंह याची उपकर्णधार म्हणून निवड केली आहे. प्रशिक्षक रोलेंट आॅल्टोमन्स म्हणाले, की आशियाई चॅम्पियन्स स्पर्धा आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. विश्व रँकिंग पाहता, भारत या किताबाचा प्रबळ दावेदार आहे. आॅलिम्पिकनंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. विजयासोबत या सत्राची सुरुवात होईल’’
श्रीजेश म्हणाला, ‘‘आम्ही भलेही आशियातील पहिल्या क्रमांकाचा संघ आहोत. मात्र, कोणत्याही संघाला कमी लेखून चालणार नाही. पाकिस्तानमध्ये उलटफेर करण्याची क्षमता आहे. कोरियादेखील चांगला खेळत आहे’’
संघ : गोलकीपर - पी. आर .श्रीजेश, आकाश चितके, डिफेंडर रुपिंदरपाल सिंह, प्रदीप मोर, जसजित सिंह कुलार, बीरेंद्र लाकडा, कोथाजित सिंह, सुरेंदरकुमार, मिडफिल्डर चिंग्लेनसाना सिंह, मनप्रीत सिंह, सरदार सिंह, एस. के. उथाप्पा, देविंदर वाल्मीकी, फॉरवर्ड तलविंदर सिंह, एस. व्ही. सुनील, ललित उपाध्याय, निकीन थिमैया, अफ्फान युसूफ.