क्रीडा- वास्कोत अखिल भारतीय सायकल शर्यत
By Admin | Updated: September 28, 2014 22:30 IST2014-09-28T22:30:02+5:302014-09-28T22:30:02+5:30
वास्को : येथील ड्रोमरीन सोशल कल्चरल व स्पोर्ट्स क्लब आयोजित तिसरी अखिल भारतीय सायकल शर्यत 2 ऑक्टोबर रोजी वास्को शहरात होणार आहे. या स्पर्धेत मुंबई, पुणे, बेळगाव, हुबळी या भागातील सायकलपटू भाग घेणार आहेत, असे माजी महसूल मंत्री आणि या शर्यतीचे प्रमुख आर्शयदाते जुझे फिलिप डिसोझा यांनी दिली. ही स्पर्धा जुझे निक्लाव डिसोझा यांच्या स्मरणार्थ आयोजित केली आहे.

क्रीडा- वास्कोत अखिल भारतीय सायकल शर्यत
व स्को : येथील ड्रोमरीन सोशल कल्चरल व स्पोर्ट्स क्लब आयोजित तिसरी अखिल भारतीय सायकल शर्यत 2 ऑक्टोबर रोजी वास्को शहरात होणार आहे. या स्पर्धेत मुंबई, पुणे, बेळगाव, हुबळी या भागातील सायकलपटू भाग घेणार आहेत, असे माजी महसूल मंत्री आणि या शर्यतीचे प्रमुख आर्शयदाते जुझे फिलिप डिसोझा यांनी दिली. ही स्पर्धा जुझे निक्लाव डिसोझा यांच्या स्मरणार्थ आयोजित केली आहे.यंदा या स्पर्धेचे घोषवाक्य ‘सायकल चालवा, तेल वाचवा’ असे आहे. शर्यतीला नगरपालिका इमारतीसमोर प्रारंभ होऊन विमानतळमार्गे चौपदरी महामार्गावरून वेर्णा जंक्शन आणि परत असा मार्ग असेल. या स्पर्धेतील विजेत्यासाठी 50 हजार, उपविजेत्यास 25 हजार आणि तृतीय पारितोषिक रु. 15,000 अशी पारितोषिके असतील, अशी माहिती जुझे फिलीप डिसोझा यांनी दिली. यावेळी प्रीतम नाईक, प्रशांत लोटलीकर, मारिओ दि वस्को व इतर क्लब सदस्य उपस्थित होते.