क्रीडा- राज्य फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धा 18 पासून
By Admin | Updated: September 11, 2014 22:31 IST2014-09-11T22:31:06+5:302014-09-11T22:31:06+5:30
पणजी : येथील रुद्रेश्वर संस्थेतर्फे तिसर्या फोमेंतो अखिल गोवा फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून 2200 मानांकनाखालील स्पर्धकांसाठीची ही स्पर्धा मिरामार येथील क्लब टेनिस दी गास्पार डायसमध्ये येत्या दि. 18 ते 21 दरम्यान घेण्यात येईल.

क्रीडा- राज्य फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धा 18 पासून
प जी : येथील रुद्रेश्वर संस्थेतर्फे तिसर्या फोमेंतो अखिल गोवा फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून 2200 मानांकनाखालील स्पर्धकांसाठीची ही स्पर्धा मिरामार येथील क्लब टेनिस दी गास्पार डायसमध्ये येत्या दि. 18 ते 21 दरम्यान घेण्यात येईल.यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेतून स्पर्धेची सविस्तर माहिती देण्यात आली. फोमेंतो उद्योग समुहाने ही स्पर्धा प्रायोजित केली असून ,तिला गोवा बुद्धिबळ संघटनेची तसेच अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाची मान्यता असल्याचे यावेळी सांगण्यात आले.स्पर्धेचे उद्घाटन दि. 18 रोजी गोवा विद्यापीठाचे कुलगुरू सतीश शेटये यांच्या हस्ते दुपारी 12 वा. होणार आहे. तर बक्षीस वितरण दि. 21 रोजी 3 वा. होईल. स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसे तसेच स्मृतिचिन्हे दिली जातील, असे यावेळी सांगण्यात आले.