स्पोर्ट: राज्यस्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धेकरिता क्रीडा प्रबोधिनी व अकोला महानगर संघ रवाना
By Admin | Updated: December 2, 2014 00:36 IST2014-12-02T00:36:01+5:302014-12-02T00:36:01+5:30
अकोला: भद्रावती (चंद्रपूर) येथे आयोजित ८४ वी वरिष्ठ राज्य मुले अजिंक्य स्पर्धा व २९ वी ज्युनिअर मुले महाराष्ट्र राज्य मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेकरिता क्रीडा प्रबोधिनी अकोला (क्रीडापीठ) व अकोला महानगर संघ रवाना झाला. स्पर्धेला मंगळवार, २ डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे.

स्पोर्ट: राज्यस्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धेकरिता क्रीडा प्रबोधिनी व अकोला महानगर संघ रवाना
अ ोला: भद्रावती (चंद्रपूर) येथे आयोजित ८४ वी वरिष्ठ राज्य मुले अजिंक्य स्पर्धा व २९ वी ज्युनिअर मुले महाराष्ट्र राज्य मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेकरिता क्रीडा प्रबोधिनी अकोला (क्रीडापीठ) व अकोला महानगर संघ रवाना झाला. स्पर्धेला मंगळवार, २ डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे.क्रीडा प्रबोधिनी संघामध्ये १९ तर महानगर संघात १६ सदस्यांचा समावेश आहे. दोन्ही संघामध्ये राष्ट्रीय पदक विजेत्यांचा भरणा आहे. क्रीडा प्रबोधिनी संघात शिवाजी मोरे, सुनील उमरिया, दीपक यादव, गोपाल राठोड, योगेश निषाद, विक्रमसिंह चंदेल वरिष्ट गटात खेळप्रदर्शन करतील. यामध्ये गोपाल होगे, विक्की जागडे, अनंता चोपडे, जिब्रान खान, हरिवंश टावरी, संग्राम भोसले, ऋषिकेश वानखडे, सचिन चौहान, राहिल, करण करमकर, शुभम चौधरी यांचा समावेश आहे.अकोला महानगर संघामध्ये वरिष्ठ गटात कुलदीप भोलाणे, निखिल वगर, शोएब खान, तेजस पटेकर, शुभम वाघ, वसीम अहमद, आशिष मिश्रा, राधेश्याम तिवारी, जयसिंग घुमन, ज्युनिअर गटात श्यामल टोपले, प्रज्वल डोंगरे, रजत मिश्रा, अजहर अली, राहुल राऊत, मोहम्मद रमिज यांचा समावेश आहे. संघासोबत राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भ, प्रशिक्षक पुरुषोत्तम बावणे, नीळकंठ देशमुख, राहुल वानखडे आहेत. दोन्ही संघाला विजयासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. (क्रीडा प्रतिनिधी)फोटोकॅप्शन: जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांच्यासोबत क्रीडा प्रबोधिनी संघातील खेळाडू.-०२सीटीसीएल६७अकोला महानगर मुष्टियुद्ध संघातील खेळाडू मार्गदर्शकांसोबत.-०२सीटीसीएल६८...